पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा माध्यमांशी बोलताना देखील ते आपले मत परखडपणे व्यक्त करताना दिसतात. टीका करणाऱ्यांनाही अजित पवार अगदी स्पष्ट शब्दात सडेतोड उत्तरं देतानाही अनेकदा पहायला मिळतात. पिंपरी चिंचवड शहरातील शरद पवार गटातील शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याला देखील अजित पवारांनी उत्तर देताना चांगलीच कानउघडणी केली आहे.
शरद पवार गटाचा निश्चय मेळावा गुरुवारी पार पडला होता. या कार्यक्रमाला जयंत पाटील देखील उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजिक पवारांवर टीका केली हेती. “अजित पवार म्हणतात मी नेहमी पहाटे उठून कामाला लागतो. शहराचा विकास केला आहे. त्या अजित पवार यांनी केवळ ठेकेदारांचा आणि त्यांच्या विचारांच्या लोकांचा विकास केला आहे”, असं कामठे म्हणाले. कामठे यांच्या या टीकेला अजित पवार हे शुक्रवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना जाहीर सभेत उत्तर दिले आहे.
‘तुमच्या आजूबाजूचा एक शहाणा, दीड शहाणा म्हणाला, की अजित पवार कॉन्ट्रॅक्टर घेऊन फिरतो. तुझ्या बापाने मी कॉन्ट्रॅक्टर सोबत फिरतो ते पाहिलं का? काहीही बोलायचं आणि आरोप करायचे. उचलली जीभ लावली टाळ्याला’, असं म्हणत अजित पवार यांनी तुषार कामठे यांचा बाप काढत कानउघडणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निखिल वागळेंची गाडी फोडणाऱ्यांवर कारवाई; धीरज घाटेंसह 200 जणांवर गुन्हा दाखल
-“लोकशाही दाबण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करणार”; रोहित पवारांचे ताशेरे
-शिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी
-“परेड काढूनही मस्ती असेल तर…”; अजित पवारांचा गुंडांना इशारा