पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या पुण्यामध्ये होत असलेल्या ‘निर्भय बनो’ या सभेला भाजप तसेच महायुतीकडून विरोध करण्यात आला होता. ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये निखिल वागळे यांना सभा घेऊन देणार नाही’, असा इशारा भाजप नेत्यांकडून देण्यात आला होता. भाजपच्या तीव्र विरोधानंतर देखील निखिल वागळे हे सभा ठिकाणी जाण्यास निघाले असता पहिल्यांदा कर्वे रस्तानंतर शास्त्री रोड तसेच दांडेकर पूल चौकामध्ये त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीवर अक्षरशः दगडांचा वर्षाव केल्याचं चित्र शुक्रवारी पाहायला मिळालं.
निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 43 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल वागळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलमध्ये ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या गदारोळानंतर किमान 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथे पुरोगामी संघटनांकडून ‘निर्भय बनो’ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शाई फेक करत दगडाने गाडी फोडण्यात आल्यानंतर देखील निखिल वागळे हे सभा ठिकाणी पोहोचले होते.
महत्वाच्या बातम्या-
-“लोकशाही दाबण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करणार”; रोहित पवारांचे ताशेरे
-शिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी
-“परेड काढूनही मस्ती असेल तर…”; अजित पवारांचा गुंडांना इशारा
-“पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडेच आता नेत्यांनी ठरवावं…”; अजितदादांचं इतर नेत्यांना आवतान