पुणे : राज्यात गुंडगिरी, गुंडांच्या टोळ्यांची दहशत माजवणं, वारंवार घडणारे गोळीबार यामुळे आता सर्वसामान्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईतील अभिषेक घोसाळकर हत्याकांडावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
पुण्यातील गुंड शरद मोहोळचीही काही दिवसांपुर्वी हत्या झाली यावरुनही सरकारवर टीका करण्यात आली होती. याबाबत बोलताना अजित पवारांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. ‘गुंडांनीच गुंडांचाच काटा काढला हे तर खरं आहे की नाही? का दुसरं कोणी आलं होतं?’ असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांनी आज पुणे विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गुंडगिरी आणि गुन्हेगारी घटनांवर भाष्य केले.
काय म्हणाले अजित पवार?
“पहिली घटना मुळशीला घडली. ते गुंडच प्रवृत्तीचे होते. गुंडांनीच गुंडांचाच काटा काढला हे तर खरं आहे की नाही? का दुसरं कोणी आलं होतं? उल्हासनगरच्या बाबतीत जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब झाली. त्यांचे जमिनीच्या व्यवहारातून गोळीबार झाला. ते दोघेही निवांत पोलीस स्टेशनमध्ये बसले होते”
“एक नागरिक म्हणून पोलिसांचं खरोखरच कौतुक केले पाहिजे. कारण आत गोळ्यांचा आवाज आल्यानंतर, एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील दुसऱ्याकडे (महेश गायकवाड) पण रिव्हॉल्वर होती. त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाही. नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी
-“परेड काढूनही मस्ती असेल तर…”; अजित पवारांचा गुंडांना इशारा
-“पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडेच आता नेत्यांनी ठरवावं…”; अजितदादांचं इतर नेत्यांना आवतान
-“भुजबळांच्या पेकाटात लाथा घालू म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का काहीच बोलत नाहीत?”