पुणे : पुण्याच्या जवळील असलेल्या तीर्थक्षेत्र आळंदी येथे मोठा वारकरी संप्रादाय आहे. येथे लहान मुलांना तसेच तरुणांना वारकरी शिक्षण दिले जाते. येथिल वारकरी शिक्षण संस्थेमधील धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. एका संस्थाचालकाने तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी आता संबंधित संस्थाचालक महाराजाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. संबंधित वारकरी शिक्षण संस्थादेखील बेकायदा असल्याची माहिती मिळत आहे.
आळंदीतील अनेक वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहेत. यापूर्वी देखील अल्पवयीन मुलांवरील अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे सर्व वारकरी शिक्षण संस्थांची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड संघटनेने केली आहे.
‘आळंदी तीर्थक्षेत्रात शेकडो कीर्तनकार महाराज मंडळींकडून वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनेक वारकरी विद्यार्थी वसतिगृह नियमबाह्य पद्धतीने चालवली जात आहेत. हे वारकरी विद्यार्थी वसतिगृह चालवताना शासनाच्या समाज कल्याण विभागाचे नियम, अटींचे पालन केले जात नाही’, असे संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हणाले आहेत.
सतीश काळे यांनी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, महिला व बाल कल्याण विभाग पुणे, धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
यावरून धार्मिक संस्कार सोडून याउलट धार्मिकतेच्या नावाखाली लहान मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रकार अशा भोंदूबाबांकडून वारंवार घडत आहे. अल्पवयीन मुलांची अनेक मार्गाने शारीरिक आणि मानसिक पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विविध महाराज मंडळी ही आर्थिक मोबदला घेऊन विविध प्रकारच्या मिरवणुकीत भर उन्हामध्ये लहान निष्पाप मुलांना फिरवत असतात. वेगवेगळ्या गावच्या सप्ताहाच्या कीर्तनात तास-न-तास टाळ, मृदंग घेऊन उभे करतात, गावोगावी मिरवणुकीसाठी पाठवले जात असल्याचंही सतीश काळे सांगितले आहे.
मुलांच्या जेवनाचा खर्च वाचावा म्हणून आळंदीत वेगवेगळ्या सप्ताहाच्या पंक्तीत, लग्नाच्या पंक्तीत त्या लहान मुलांना वारकरी वेश परिधान करून बसवले जाते. यापूर्वी आळंदी भागातील वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अशाप्रकारे अनेक निष्पाप बालकांवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. असे गैरप्रकार सातत्याने होऊनही येथील वारकरी संस्थांच्या कारभाराची चौकशी होत नसल्याचं सतीश काळे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“परेड काढूनही मस्ती असेल तर…”; अजित पवारांचा गुंडांना इशारा
-“पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडेच आता नेत्यांनी ठरवावं…”; अजितदादांचं इतर नेत्यांना आवतान
-“भुजबळांच्या पेकाटात लाथा घालू म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का काहीच बोलत नाहीत?”
-..अन् शिक्षण मंत्री बनले शिक्षक! चंद्रकांतदादांनी घेतली विद्यार्थ्यांची शाळा