पुणे : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांची काढलेली परेड चांगलीच चर्चेत आहे. सगळ्या गुंडांना एकत्रित बोलावून सज्जड दम देऊनही पोलिसांचे आदेश न मानता गुंडगँग सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करताना दिसत आहे. याबाबत आज पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बोलत होते.
परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल. लोकांच्या मनातून भिती गेली पाहिजे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन दिवस सुमारे ५०० गुन्हेगारांना एकत्र बोलून त्यांची परेड काढली. त्यांना गुन्हे न करण्याचा दम दिला.
‘कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यायचा नाही, सहभागी व्हायच नाही, गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायचे नाहीत’, अशा सूचना दिल्या मात्र तरीही या प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करणं सुरुच आहे.
“गुंडांचे असे प्रकार सुरु असतील तर या सगळ्या गुन्हेगारांना खाक्या दाखवायला हव्या. आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात नेमकी कारवाई कोणती करायची किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या यासंदर्भात चर्चा करणार आहे” असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
कुख्यात गुंड गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख १५ गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या ५० टोळ्यांतील सुमारे ५०० सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले.
मात्र त्यानंतरही पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळकडून रिल्स व्हायरल करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले.
महत्वाच्या बातम्या-
-“पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडेच आता नेत्यांनी ठरवावं…”; अजितदादांचं इतर नेत्यांना आवतान
-“भुजबळांच्या पेकाटात लाथा घालू म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का काहीच बोलत नाहीत?”
-..अन् शिक्षण मंत्री बनले शिक्षक! चंद्रकांतदादांनी घेतली विद्यार्थ्यांची शाळा