पुणे : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सध्या संपूर्ण देशात ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नाणेगावचा प्रवास करत आहेत. या दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील यांनी नाणेगावच्या ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नाणेगावच्या शाळेला ही त्यांनी भेट दिली. या भेटीत शाळेच्या मुलांना पुस्तके भेट देऊन या पुस्तकांचे वाचन मुलांना करायला लावले. पुस्तकांचे वाचन करताना अडखळणाऱ्या विद्यार्थ्यांना चंद्रकांत पाटलांनी प्रेमाने जवळ करून वाचनास मदत केल्याचंही पहायला मिळालं. चंद्रकांत पाटलांचे हे नवे शिक्षकी रुप पहिल्यांदाच पहायला मिळाले आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटपही केले.
या अंतर्गत पक्षाच्या सर्व नेत्यांनी गावात जाऊन राहण्याचा तिथल्या नागरिकांशी संवाद साधण्याचा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकोपयोगी योजनांची माहिती ग्रामस्थांना देऊन गावातील लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अंतर्गत चंद्रकांत पाटील बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील नाणेगावचा प्रवास करत आहेत.
बुधवारी चंद्रकांत पाटील गावच्या विठ्ठल मंदिरात जाऊन भजनात भाग घेतला. त्यानंतर ग्रामस्थांसोबत एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. गुरुवारी सकाळी गावातील महिला बचत गटाच्या महिलांशी देखील संवाद साधून त्यांना मा. मोदीजींच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या येजनांची माहिती दिली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. लाभार्थ्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी नाणेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्यै वाचनाची गोडी निर्माण व्हावी; यासाठी गोष्टीची पुस्तके भेट दिली. तसेच, यापैकी काही विद्यार्थ्यांनीना पुस्तक वाचायला लावले.