करोडो भारतीयांसह जगभरातील नजरा या अयोध्येकडे लागल्या आहेत. आज ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भव्य अशा मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. यानिमित्ताने संपूर्ण अयोध्या नगरी सजली असून सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिराला फुलांच्या सजावटीसाठी शोभिवंत फुलझाडे पुरविण्याचे आणि सजावटीचे काम पुण्यातील उरुळी कांचन येथील रामवाटिका या कंपनीने केले आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या सजावटीसाठी राम वाटिकेच्या माध्यमातून साडेसात हजार शोभिवंत फुलझाडे पुरविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे रामसेवा करण्यासाठी रोपवाटिकेचे बिंटू पवार, विजय कदम, सचिन ब्राह्मणकर आणि संज शाह यांच्या माध्यमातून कोणतेही शुल्क न घेता हे सेवाकार्य करण्यात आलं आहे.
अयोध्येतील राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आज होत असला तरी त्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. १६ जानेवारी पासून मंदिर परीसर सजावटीचे कार्य केले जात असून मंदिराचा मुख्य गाभारा, आणि मंदिराच्या बाहेरील भागाची सजावट रामवाटीकेच्या माध्यमातून करण्यात आल्याचं पवार यांनी सांगितल आहे
.