पुणे : विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता पुण्यात बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
त्यामुळे पुण्यात नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पुण्यातून तब्बल २८ लाख ६६ हजार १०० रुपयांचा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी एकूण ५ जणांना अटक केली असून यामध्ये २ महिलांचा समावेश आहे. मनिषा ठाणेकर, भारतीय गवंड, सचिन यमगर, नरेश शेट्टी, प्रभू गुगलचड्डी अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडून एक प्रिंटर मशीन तसेच ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचे प्रिंटेड गठ्ठे जप्त करण्यात आले आहेत. तर २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आरोपींनी या नोटा बँकेत जमा केल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी या रॅकेटचा पर्दाफाश झाला. आता या रॅकेटमागे कोणाकोणाचा हात आहे? याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
-मुहूर्त ठरला! अखेर सिंहगड रोडचा उड्डाणपूल होणार खुला
-पुणे महापालिकेला मिळाले ‘हे’ नवे अतिरिक्त आयुक्त
-“पाकिस्तानचं पाणी बंद केलंच नाही, सरकार खोटं बोलतंय”; प्रकाश आंबेडकरांचं दाखवलं ‘ते’ पत्र