पुणे : भाजपचे शहराध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरु असतानाच पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये ४ आमदारांच्या गटांनी चांगलीच फिल्डींग लावल्याचे पहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे पद महत्वाचे असल्याने शहराध्यक्ष पदासाठी पक्षातील जुन्या आणि नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या ८ नवीन निकषांनुसार शहराध्यक्षाची निवड होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे, विद्यमान शहराध्यक्ष, पिंपरीचे आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे या आमदारांसह पक्षाच्या जुन्या गटामध्ये ही रस्सीखेच पहायला मिळत आहे. जुन्या गटात माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे या पदाधिकारी आहेत. तर या चारही गटांनी शहराध्यक्षपद आपल्याकडेच रहावे यासाठी जोरदार ताकद लावल्याचे दिसत आहे.
शहराध्यक्षपदासाठी आतापर्यंत ८ इच्छुकांची नावे समोर आली आहेत. या इच्छुक उमेदवारांमध्ये जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांत स्पर्धा आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नामदेव ढाके, विलास मडिगिरी, अनुप मोरे, भीमा बोबडे, शैला मोळक यांच्या नावांची चर्चा आहे. तर नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये विद्यमान शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, विजय फुगे इच्छुक आहेत.
वरिष्ठांचे ८ निकषांनुसार होणार निवड
- अनुशासित व प्रामाणिक व्यवहार असलेला इच्छुक उमेदवार असावा.
- इच्छुक उमेदवार पक्षातील अनुभवी कायकर्ता असावा.
- त्या उमेदवाराने यापूर्वी संघटनेच्या जबाबदारीच्या पदावर काम केलेले असावे.
- इच्छुक उमेदवार हा किमान दोन टर्म सक्रिय सदस्य असलाच पाहिजे.
- नवीन पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याचा शहर-जिल्हाध्यक्ष पदासाठी विचार केला जाणार नाही.
- इच्छुक उमेदवार आमदार, खासदार नसावा.
- महिला, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यांचे नाव खालून आलेच पाहिजे.
- शहर-जिल्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार ४५ ते ६० वयोगटातील असावा.
महत्वाच्या बातम्या
-“पाकिस्तानचं पाणी बंद केलंच नाही, सरकार खोटं बोलतंय”; प्रकाश आंबेडकरांचं दाखवलं ‘ते’ पत्र
-परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची चिंता मिटली; प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा प्रश्न मार्गी
-महाराष्ट्रात ५ हजार पाकिस्तानी; मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात सर्वाधिक संख्या, पुण्यात किती?
-ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत वसंत मोरे म्हणाले, ‘हे दोन्ही नेते एकत्र आले तर…’