पुणे : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेशन व इतर गोष्टींची पूर्तता करण्यामधील अडचणींमध्येही दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आल्यानंतर पुन्हा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे घेतली जाणारी परीक्षा द्यावी लागते, ती परीक्षा पास झाल्यानंतरच या विद्यार्थ्यांना भारतामध्ये इंटर्नशिप करता येते.
सध्याच्या प्रचलित नियमानुसार सदर इंटर्न चालू झाल्यावर या विद्यार्थ्यांना मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून ९० दिवसांमध्ये प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळणे अपेक्षित असते, परंतु पदव्युत्तर शिक्षणासाठीची NEET प्रवेश परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ एप्रिल रोजी सुरु झाली असून ७ मे पर्यंत सुरु राहणार आहे. त्यासाठी अंतिम तारीख १५ ते २० दिवसांवरती येऊन ठेपलेली असताना देखील हे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून अनेक विद्यार्थ्यांना मिळाले नव्हते. त्यासाठीची फी आकारणी देखील चालू करण्यात आली नव्हती.
वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठीची चढाओढ बघता या अतिशय महत्त्वाच्या काळात अनेक विद्यार्थी प्रवेश परीक्षेचा अभ्यास करायचा सोडून या प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच्या मागे धावपळ करताना दिसत होते, त्यामुळे क्षमता असताना देखील आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यावरील परीक्षेसाठी असणारा अमूल्य वेळ या विद्यार्थ्यांना वाया घालवावा लागत होता. ही व्यथा विद्यार्थी आणि पालकांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगेंना सांगितली. त्यांनी गांभिर्याने लक्ष घालून विधान परिषद आमदार उमा खापरे यांना हा प्रकार सांगितला.
उमा खापरे आणि विद्यार्थी पालकांची भेट घालून देताच तात्काळ खापरे यांनी संबंधित खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याशी संपर्क साधला आणि या विषयावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. वैदयकिय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ताबडतोब या संदर्भातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलसोबत संपर्क साधून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मदत होईल तसेच कोणताही त्रास होऊन नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्याचे आदेश दिले.
परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या या विद्यार्थ्यांना पुढील काही तासातच आवश्यक पेमेंट लिंक महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या वतीने पाठविण्यात आल्या आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. अनेक विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अंदाजे सोळाशेहुन अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढण्याचे काम सुरु विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढण्याचे काम सुरु असून आणि ते लवकरच विद्यार्थ्यांना पाठविण्यात येतील असे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या प्रतिनिधिने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
-महाराष्ट्रात ५ हजार पाकिस्तानी; मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात सर्वाधिक संख्या, पुण्यात किती?
-ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत वसंत मोरे म्हणाले, ‘हे दोन्ही नेते एकत्र आले तर…’
-चांगल्या रस्त्यांची लागणार वाट! खोदकामामुळे शहरात ५० ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता, नेमकं कारण काय?
-शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री म्हणतात, ‘अजितदादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात अन् आमची…’