पुणे : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत ठाकरे बंधूंकडून अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे युती होणार की नाही याबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्याप संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वी मनसेमध्ये असणारे आणि काही महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या सेनेत सामिल झालेले वसंत मोरे यांनी युती किती शक्यता आहे यावर भाष्य केलं आहे.
“सध्या राज्यामध्ये कोणत्याही निवडणुका नाही. असं असताना देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीबाबत भाष्य केलं आणि त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर असं वातावरण तयार झाला आहे की सगळ्याच निवडणुका सुरू झाल्या आहेत”, असे वसंत मोरे म्हणाले आहेत.
“…जर एकत्र आले तर आमच्यासारख्यांना आनंदच होईल”
“नुकत्याच लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच राजकारणाचा गाभा असतो आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाल्याने बऱ्याच पक्ष्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झाला आहे. राज्यातील चौका चौकामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत चर्चा सुरू आहेत. ते जर एकत्र आले तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंदच होईल. राजकीय पक्षांनी यामधे न पडता दोन्ही ठाकरे बंधू युती बाबतचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते चिडल्याचं पाहायला मिळालं यावर बोलताना मोरे म्हणाले, ये डर होना जरुरी है प्रत्येकाच्या पोटामध्ये गोळा निर्माण झाला आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकत्र आले तर चांगल्या चांगल्यांना घाम फुटेल, असं मोरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-चांगल्या रस्त्यांची लागणार वाट! खोदकामामुळे शहरात ५० ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता, नेमकं कारण काय?
-शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री म्हणतात, ‘अजितदादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात अन् आमची…’
-पहलगाम हल्ला: सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई; पोलिसांनी ‘त्या’ दोघांची घरे उडवली
-बारामतीचं शिष्टमंडळ अडकलं काश्मीरमध्ये; अजितदादांचा केंद्रीय मंत्री मोहोळांना फोन