पुणे : बारामती तालुक्यातील सहकारी दूध उत्पादक संघाचे शिष्टमंडळ हे अभ्यास दौऱ्यासाठी काश्मीर परिसरात अडकले आहेत. गेल्या २ दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर या शिष्टमंडळाला तत्काळ बारामतीत आणण्यासाठी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली आहे.
बारामतीतील दूध संघाचे शिष्टमंडळ काश्मीर येथील अभ्यास दौऱ्यावर आहे. आज अजित पवार यांनी बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या शिष्टमंडळाशी संपर्क साधला. त्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी देखील चर्चा केली. काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मुंबईत रात्रदिवस खासगी सचिवांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली आहे.
अजित पवारांच्या सूचनेनंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दर २ तासांनी अडकलेल्या नागरिकांच्या परतीच्या प्रवासाची माहिती घेण्यात येत आहे. ‘आपल्या भागात येणाऱ्या नागरिकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाशी तर विमानाने येणाऱ्या नागरिकांनी मंत्री मोहोळ यांच्या कार्याशी संपर्क साधावा’, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
-“माझ्या नवऱ्याचा चेहराही पाहता आला नाही”; शरद पवारांसमोर संतोष जगदाळेंच्या पत्नीचा टाहो
-शरद पवारांनी ठाकरेंना लिहिलेले ‘ते’ पत्र आयोगासमोर यायला पाहिजे; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
-पुणे महापालिकेत सरकारी नोकरीची संधी; कशी आहे अर्ज प्रक्रिया
-काश्मीरमध्ये हल्ला: काश्मीरमधील पर्यटकांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील जोडपे पुढे सरसावले