पुणे : काश्मीरच्या पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामध्ये आतपर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जखमी अनेक पर्यटकही जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी कॉन्टोन्मेंट येथे मीटिंग घेतली. मृत पर्यटकांच्या काही शवपेट्या तिथेच असून जखमी पर्यटकांवर तेथिल आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आता महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्यासाठी एका जोडप्याने पुढाकार घेतला आहे.
लग्नानंतर फिरायला म्हणून गेलेल्या पती-पत्नी मंगळवारी श्रीनदर येथे गेले होते. त्याच वेळी पेहलगाम येथे हल्ला झाल्याचे समजताच महाराष्ट्रातीस पर्यटकांना मदत म्हणून एका जोडप्याने आर्मी ऑफिसरच्या मदतीने 15 Corps med headquarter, Shrinagar येथील आर्मी कॉन्टोन्मेंटचा पास काढला आहे. मंगळवारी आणि आजही हे पेहलवाम येथिल महाराष्ट्रातील जखमींना मदतीसाठी हजर आहेत.
“महाराष्ट्रातील पर्यटकांना आम्हाला हेच सांगायचं आहे की आपण एकमेकांना या परिस्थितीत साथ देऊ या आम्ही देखील या ठिकाणी पुढील ५ दिवस आहोत. महाराष्ट्रातील पर्यटकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना काही मदत लागल्यास व्हाट्सअँप नंबर वर आपण आम्हाला संपर्क करा. आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इथली आर्मी व हॉस्पिटल प्रशासन यांच्या संपर्कात आहोत”, अशी माहिती धनंजय जाधव आणि पुजा जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, सोनमर्ग गुलमर्ग ही पर्यटनस्थळ आज पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.
व्हाट्सअप नंबर – 8983904888 धनंजय जाधव/पुजा मोरे/जाधव
महत्वाच्या बातम्या
-फिरायला गेले ते परतलेच नाहीत! कश्मीर हल्ल्यात पुण्याच्या २ जिवलग मित्रांचा मृत्यू
-युपीएससी २०२४चा निकाल जाहीर! पुण्याच्या अर्चित डोंगरेने पटकावला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
-भाजप मंडल अध्यक्ष व्हायचं असले तर DNA…; ‘त्या’ बॅनरची राज्यभर चर्चा
-राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्याची चर्चा; महाराष्ट्रात येताच युतीची घोषणा करणार?
-पालिकेने EWS सदनिकांची दुरावस्था; कोट्यवधींची चोरी, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह