पुणे : काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला असून येत्या रविवारी (उद्या) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच ‘थोपटे काँग्रेसला सोडचिट्टी देत आहेत त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत’ असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
‘मध्यंतरी काँग्रेसने त्यांना विधानसभा अध्यक्ष करण्याचा ठरवलं होतं पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्या पदापर्यंत जाऊ दिलं नाही. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लागू दिली नाही. त्यांच्या परिवारातला संघर्षाचा वारसा त्यांनी जोपासला पाहिजे असे अपेक्षा आहे. संग्राम थोपटे त्याकाळी विधानसभेचे अध्यक्ष झाले असते तर आज हे झाले नसते. हे सगळं देवेंद्र फडणवीसांमुळे झालं आहे’, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.
‘थोपटे यांच्यावर अन्याय देवेंद्र फडणवीस यांनी केला. ज्या व्यक्तीने काँग्रेसचे नुकसान केलंय, महाराष्ट्राचे नुकसान केलंय त्या देवेंद्र फडणवीस यांच्या कुठल्याही झाशामध्ये संग्राम थोपटे यांनी येऊ नये. याने आत्मघातकी आणि चुकीचा संदेश जाईल असा निर्णय घेऊ नये. थोपटे यांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या ११ तारखेला मी भोरमध्ये त्यांच्या घरी गेलो होतो मात्र संग्राम थोपटे यांची भेट झाली नाही’, असे देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
-माजी आमदार संग्राम थोपटेंनी सोडला ‘काँग्रेस’चा ‘हात’; २ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?
-भाजप पुण्याचा कारभारी बदलणार; ब्राह्मण, मराठा की ओबीसी कोणाच्या गळ्यात पडणार शहराध्यक्ष पदाची माळ?
-पुण्यात काँग्रेस भाजप समर्थक आमने-सामने; काँग्रेस भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
-वकिल महिलेला रक्त साकळे पर्यंत मारहाण; अजित पवार म्हणाले, ‘कायदा श्रेष्ठ’
-‘खोट्या शपथा घेणाऱ्या गोप्याला कुणीही फारसे महत्व देऊ नये’; अजित पवारांचे नेते पडळकरांवर आक्रमक