पुणे : काँग्रेसचे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने पुणे जिल्ह्यातून महाविकास आघाडीला मोठा बसला आहे. संग्राम थोपटे यांनी प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आपला राजीनामा ई-मेलद्वारे पाठवल्याचे समोर आले आहे. अनेक दिवसांपासून थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. रविवारी भोरमध्ये ते कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. संग्राम थोपटे यांनी घेतलेल्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ही लोकशाही आहे. पण, थोपटेंच्या प्रवेशाबद्दलची माहिती माझ्यापर्यंत आली नाही. माझे आणि संग्राम थोपटेंचे सातत्याने बोलणे होते. पक्ष बदल करतोय, हे संग्राम थोपटेंनी मला सांगितले नाही. थोपटेंशी आमचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. लोकसभा आणि विधानसभेला आम्ही ताकदीने एकमेकांचे काम केले आहे. संग्राम थोपटे महाविकास आघाडीसोबत राहतील, हा विश्वास आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखण्याची गरज नाही. संग्राम थोपटे हे अनुभवी नेते आहेत. ते तीनवेळा आमदार असताना उत्तम काम केले आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर विधानसभेचे थोपटे आमदार होते. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या विजयामध्ये थोपटेंच्या भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे. संग्राम थोपटेंनी लोकसभेला सुप्रिया सुळेंना भोर मतदारसंघातून ४२ हजारांचं लीड मिळवून दिले आहे. परंतु लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंना पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नाराज होते आणि म्हणूनच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-माजी आमदार संग्राम थोपटेंनी सोडला ‘काँग्रेस’चा ‘हात’; २ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?
-भाजप पुण्याचा कारभारी बदलणार; ब्राह्मण, मराठा की ओबीसी कोणाच्या गळ्यात पडणार शहराध्यक्ष पदाची माळ?
-पुण्यात काँग्रेस भाजप समर्थक आमने-सामने; काँग्रेस भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
-वकिल महिलेला रक्त साकळे पर्यंत मारहाण; अजित पवार म्हणाले, ‘कायदा श्रेष्ठ’
-‘खोट्या शपथा घेणाऱ्या गोप्याला कुणीही फारसे महत्व देऊ नये’; अजित पवारांचे नेते पडळकरांवर आक्रमक