पुणे : भोर-मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. मात्र, आता एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार आज थोपटेंनी काँग्रेसचा हात सोडल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. रविवारी उद्या संग्राम थोपटे हे आपल्या समर्थकांची बैठक बोलावली असून भाजप प्रवेशाबाबत बैठकीमध्ये घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे कट्टर समर्थक आणि भोर मतदारसंघातील मोठं राजकीय घराणे म्हणून थोपटे कुटुंबाकडे पाहिलं जातं. संग्राम थोपटे हे ३ वेळा काँग्रेसच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे देखील ६ वेळा भोर विधानसभेचे आमदार राहिले होते. आतापर्यंत काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणवले जाणारे थोपटे आता काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जाणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोर विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवखे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला. गेल्या अनेक टर्म थोपटेंकडे राहिलेला मतदारसंघ ऐनवेळी अजित पवारांच्या ताब्यात गेला. शंकर मांडेकर आणि संग्राम थोपटे यांच्या लढतीमध्ये थोपटेंना मांडेकरांना तब्बल २० हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. विधानसभा निवडणुकीपूर्वीच थोपटे हे भाजपच्या संपर्कात होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ते काँग्रेसला रामराम करतील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आता येत्या २ दिवसांत रविवारी संग्राम थोपटे हे काँग्रेला रामराम करणार असून २२ एप्रिल रोजी थोपटे हे हाती कमळ घेणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-भाजप पुण्याचा कारभारी बदलणार; ब्राह्मण, मराठा की ओबीसी कोणाच्या गळ्यात पडणार शहराध्यक्ष पदाची माळ?
-पुण्यात काँग्रेस भाजप समर्थक आमने-सामने; काँग्रेस भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
-वकिल महिलेला रक्त साकळे पर्यंत मारहाण; अजित पवार म्हणाले, ‘कायदा श्रेष्ठ’
-‘खोट्या शपथा घेणाऱ्या गोप्याला कुणीही फारसे महत्व देऊ नये’; अजित पवारांचे नेते पडळकरांवर आक्रमक
-‘आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, महाराष्ट्रात रहायचं असेल तर…’; अजित पवारांचं वक्तव्य