पुणे : मराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन अनेकदा राजकीय वाद झाल्याचे पहायला मिळाला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. अजित पवार हे आज पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी मराठी भाषेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. “आपली भाषा ही मराठी आहे, त्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. अभिजात दर्जा देण्याचे धाडस केवळ मोदींनी केला आहे”, उल्लेख देखील यावेळी अजित पवार यांनी केला आहे.
“मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला मराठी आलीच पाहिजे. असं परखड मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. आपली मातृभाषा ही मराठी आहे. त्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी आपुलकी असते.. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे..! pic.twitter.com/a68CU6NK3Q
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 18, 2025
“जगामध्ये बहुतांश देशात इंग्रजी भाषा बोलली जाते. भारतात हिंदी भाषा बोलली जाते. ती राष्ट्रभाषा आहे, यावरून अनेक वाद आहेत. मी त्यात जाणार नाही. परंतु, ज्या पद्धतीने बहुतांश देशांमध्ये इंग्रजी बोलली जाते त्याचप्रमाणे तिन्ही भाषा बोलल्या पाहिजेत. जसं जगात इंग्रजी भाषा जास्त वापरली जाते तसेच महाराष्ट्रात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे. इंग्रजी बहुतेक देशांमध्ये चालते मात्र, आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपल्या मातृभाषेला नंबर एकच स्थान आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-स्वारगेट प्रकरण: न्यायालयात भक्कम पुराव्यासह ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल; दत्ता गाडेचा ‘तो’ दावा फोल
-‘मी २२ व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण…’; पडळकर नेमकं कोणाला म्हणाले?
-पुण्यात दर्गात घुसून राडा; खासदार कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
-एकही अनधिकृत फ्लेक्स न उभारता साजरा झाला आमदार हेमंत रासनेंचा वाढदिवस