पुणे : पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांनी औंध मधील गाळे धारकांना बेकायदेशीररित्या परवाने दिल्या प्रकरणी दोषी आढळलेले अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई केली आहे. औंध मधील परिहार चौकातील शिवदत्त मिनी मार्केटमधील गाळेधारकांना बेकायदेशीर रित्या परवाने दिले. या प्रकरणासह मिळकत कर विभागातही अधिकारी नसताना २ हजार चौरस फूटांपेक्षा जास्त क्षेत्रफळांच्या मिळकतींच्या करात परस्पर बदल केल्या प्रकरणी देखील दोषी आढळले आहेत. यामुळे जगताप यांच्या दोन पदोन्नती तात्पुरत्या थांबविल्या आहेत, अशी माहिती पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे.
परिहार चौकातील जागा महापालिका ११ वर्षांसाठी शिवदत्त मित्र मंडळाला दिली होती. शिवदत्त मित्र मंडळाने या जागेवर मिनी मार्केट सुरु केले होते. ११ वर्षांचा करार संपल्यानंतर महापालिकेने पुन्हा करार वाढविण्यास असमर्थता दर्शविली होती. यानंतरही तत्कालीन अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी स्वत:चा अगोदरचा निर्णय फिरवत येथील गाळेधारकांना पथारी परवाने दिले.
२०१७ पासून पथारी परवाने बंद असताना देखील गाळे धारकांना परवाने जगताप यांनी परवाने दिले. तसेच गाळेधारकांच्या यादीमध्ये बदल देखील करण्यात आला. परवान्यांसाठी रहिवासी दाखला बंधनकारक असतो तरीही ५ गाळेधारकांना रहिवासी दाखल्याशिवाय परवाने देण्यात आले होते. यावेळी स्थानिक नगरसेविका अर्चना मुसळे आणि त्यांचे पती अॅड. मधुकर मुसळे यांनी येथील गाळ्यांमुळे अडकलेला पदपथ मोकळा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर बेकायदेशीर परवाने दिल्याचे उघड झाले. या गैरप्रकाराविरोधात जनआंदोलन देखील करण्यात आले.
दरम्यान, महापालिका आयुक्तांनी याप्रकरणाची चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये माधव जगताप आणि त्यांचे काही सहकारी दोषी आढळले. जगताप हे खात्यांतर्गत चौकशीमध्ये दोषी आढळले, यामुळे पृथ्वीराज बी.पी. यांनी जगताप यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. पृथ्वीराज बी.पी. यांनी माधव जगताप यांच्या दोन तात्पुरत्या वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र दिसणार! अजित पवार- शरद पवारांची १० दिवसांत तिसरी भेट
-PMC: ठेकेदाराचे ‘लाड’ पुरवण्यासाठी अधिकारीच बनले ‘सैनिक’, बहुउद्देशीय पायघड्यांवर गुळगुळीत उत्तर
-“पवारांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विषय उकरुन काढतात, त्यांनी फावल्या वेळात…” – गोपीचंद पडळकर
-धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत