पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता प्रदेशाध्यक्षपदासोबत शहराध्यक्ष बदलण्याची भाजपची तयारी सुरू झाली आहे. शहराध्यक्ष या पदासाठी अनेक जण इच्छुक असून यंदा भाजप ओबीसी नेत्यावर पुणे भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता असल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.
भाजपने गेल्या ३ वर्षांत शहराध्यक्ष म्हणून मराठा आणि ब्राह्मण समाजाला प्राधान्य दिले होते. मात्र आता ओबीसी नेत्याला संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे पुणे शहराध्यक्ष हे धीरज घाटे असून आता आमदार योगेश टिळेकर, हेमंत रासने, माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, गणेश बिडकर या नेत्यांच्या नावाची चर्चा शहराध्यक्ष पदासाठी सुरु आहे. वरिष्ठ पातळीवर या नेत्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, धीरज घाटे यांच्या पदाचा कार्यकाळ काही दिवसानंतर समाप्त होणार आहे. आता त्यांच्या जागी ओबीसी चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्षी मंत्रिपदी लागली. भाजपने प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली त्यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षात अनेक मोठे बदल करण्यात आले. त्यामध्ये पुण्याच्या शहराध्यक्ष पदांचाही समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
-PMC: ठेकेदाराचे ‘लाड’ पुरवण्यासाठी अधिकारीच बनले ‘सैनिक’, बहुउद्देशीय पायघड्यांवर गुळगुळीत उत्तर
-“पवारांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विषय उकरुन काढतात, त्यांनी फावल्या वेळात…” – गोपीचंद पडळकर
-धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत
-युवा नेत्याचा मोठा डाव अजितदादा, विखे अन् शिंदेंना एकाच मंचावर आणणार, कोणाची विकेट उडणार?