पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली आहे. राज्यातील धनगर समाज एकवटला जाणार असून येत्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अहिल्यादेवींच्या राष्ट्र प्रगतीच्या विचाराला, हिंदू धर्माच्या विचाराला अभिवान करण्यासाठी ५० हजार धनगरी ढोल वाजवून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असल्याचे पडळकरांनी सांगितले आहे. ‘धनगरी नाद’ या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहरात करण्यात येणार असल्याचेही पडळकरांनी सांगितले आहे. अशातच पुण्यात घेतलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवारांवर सडकून टीका केल्याचे पहायला मिळाले आहे.
किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे. याठिकाणी आणखी २० पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजेत. संभाजी ब्रिगेड टोकाची भूमिका मांडते. २०१२ साली असाच काहीसा प्रयत्न झाला होता. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे, असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.
‘शरद पवारांनी फावल्या वेळेत नवा इतिहास काढावा’
‘उदयनराजे यांच्याबद्दल नितांत आदर आहे, हे खुसपट ब्रिगेडने काढले आहेत. शरद पवारांना फॉर असलेल्या या संघटना विषय बाहेर काढतात. सगळे इतिहासकार पवार साहेबांना फॉर आहेत. शरद पवारांनी (Sharad Pawar) फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा. एकदाच नवीन इतिहास लिहा, म्हणजे पुढच्या पिढ्यांना परत इतिहास लिहण्याची गरज नाही, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
महात्मा फुले सिनेमावर आक्षेप घेतला जात आहे
‘जात बघून इतिहास काढायचा. नवीन इतिहासकार जागे झाले आहेत. नवीन इतिहासकार लाँच झाले आहेत. हे इतिहासकार 250 रुपयांचे जॅकेट घालून फिरत असतात’, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हणाले आहेत.
अजित पवारांना कार्यक्रमाला बोलवणार नाही?
‘पुण्यातील रेसकोर्स मैदानावर या कार्यक्रमाचे करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अजित पवार यांना नाही बोलवणार, हा कार्यक्रम राजकीय नाही, कोणाला बोलवावे हे समाजाला विचारून कळवू’, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत
-युवा नेत्याचा मोठा डाव अजितदादा, विखे अन् शिंदेंना एकाच मंचावर आणणार, कोणाची विकेट उडणार?