पुणे : गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर भागामध्ये एका कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी हलीमुद्दीन शेख या नराधमाला अटक केली आहे. अशातच आता दिल्लीत देखील असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. राजधानी दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील कैलास नगर भागात अनेक कुत्र्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी एका नराधमाला अटक करण्यात आली आहे. एका प्राणी स्वयंसेवी संस्थेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आरोपी नौशादला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी कैलास नगरमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्ती नराधमाने अनेक कुत्र्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप एका स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आला आहे.
मूळचा बिहारचा असणारा नराधम नौशादने कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, असे दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. व्हिडिओमध्ये त्या माणसाला लोक मारहाण करताना आणि त्याने किती कुत्र्यांवर अत्याचार केला आहे, असे विचारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका प्राणी प्रेमीने सोशल मिडिया एक्सवरती शेअर केला आहे. अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप असलेल्या आरोपीला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Delhi: Naushad arrested for raping 13 street dogs, filming his criminal act and circulating on WhatsApp
Sick Mazhub 🤮🤮🤮
Join | https://t.co/bq8DAxNpe8 pic.twitter.com/MojZXAZcN2— Satyaagrah (@satyaagrahindia) April 12, 2025
शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये ‘तू किती कुत्र्यांवर अत्याचार केला आहे?’, असे एकजण विचारताना ऐकू येत आहे. प्राणी प्रेमींने दिल्ली पोलिस, मुख्यमंत्री रेखा गुप्ता, एलजी कार्यालय आणि इतर अनेक नेत्यांनाही हा व्हिडिओ टॅग केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने किमान १२-१३ मादी कुत्र्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप एनजीओने केला आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
-दादा शब्दाचा पक्का; अजित पवारांनी केली झापूक झुपूक सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी
-‘काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय…’; अजित पवार नेमकं काय म्हणाले? पहा व्हिडीओ
-बांग्लादेशी तरुणीला पुण्यात नोकरीचे अमिष दाखवून आणले अन् बुधवार पेठेत…; नेमकं काय प्रकरण?
-पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणारा अहिल्यानगर पैलवान नेमका कोण?
-अष्टविनायकासह ‘या’ ५ मंदिरात पोशाखाची नियमावली जारी!; दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे?