पुणे : पुण्यात नोकरी आणि फिरायला नेण्याचे अमिष दाखवत एका बांग्लादेशातील १६ वर्षीय तरुणीला तिच्याच मैत्रिणीने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीची ५ लाख रुपयांमध्ये विक्री केली. तिला डांबून ठेवण्यात आलं होतं. तिने स्वत:ची सुटका करुन घेतली आणि रिक्षाने हडपसरमध्ये पोहचलेल्या या मुलीने पोलिसांत तक्रार केली. यावरुन फरासखाना पोलिसांनी एका महिलेला तसेच तिच्यासोबत असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीने डिसेंबर महिन्यात भारतात फिरायला नेण्याचे तसेच पुण्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. मैत्रिणी मध्यस्थांमार्फत मुलीसोबत भारतात प्रवेश आली. त्यानंतर या दोघीही रेल्वेतून पुण्यात आली. सुरुवातीला ती चाकण भागात राहायला होती. त्यानंतर मैत्रिणीने बुधवार पेठेतील कुंटणखाना मालकिणीशी संपर्क साधला. युवतीची तीन लाख रुपयांत विक्री केली. तिला बुधवार पेठेतील एका लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले.
मुलीकडचे मोबाईल वगैरे सर्व साहित्य कुंटणखाना मालकिणीने काढून घेतले. त्यामुळे तिला कोणाशी संपर्क साधता येत नव्हता. तिला कुंटणखाना मालकिणीसह साथीदार महिलांनी वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले, तसेच बांगलादेशी असल्याने पोलिसांच्या ताब्यात देऊ, अशी धमकी तिला देण्यात आली होती. अखेर कोणाचे लक्ष नसल्याची संधी साधून तिने पळ काढला. बुधवार पेठेतून ती हडपसर भागात पोहचली. तिने हडपसर पोलिसांकडे या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन फरासखाना पोलिसांकडे तपासासाठी सोपविला. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणारा अहिल्यानगर पैलवान नेमका कोण?
-अष्टविनायकासह ‘या’ ५ मंदिरात पोशाखाची नियमावली जारी!; दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे?
-कोल्हापूरच्या सतेज पाटलांच्या पुण्यात महत्वाच्या बैठका; शहराध्यक्ष आणि संघटनात्मक मोठे बदल होणार!