पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेला वेळेत उपचार मिळाले नाही, परिणामी महिलेच्या नातेवाईकांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं. दुसऱ्या रुग्णालायमध्ये महिलेवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. महिलेची प्रसुती झाली मात्र, महिलेने दोन चिमुकल्यांना जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाच्या हव्यासापोटी महिलेला रुग्णालयामध्ये दाखल न करुन घेता पैशाची मागणी केली. यावरुन आता पुणे महापालिकेकडून सगळ्या खासगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे.
‘तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये. रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे’, असे महापालिकेने रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. ‘रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका. आधी उपचार करा आणि नंतर पैसे मागा’, अशा संदर्भातले आदेश पालिकेकडून प्रत्येक खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारांसंदर्भात नोटीस पाठविली आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रूग्ण आणि रुग्णाच्या नातेवाइकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा (मेडिकल निगलिजन्स) आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. या प्रकरणी ससूनच्या अधीक्षकांना पत्र लिहीत पोलिसांनी स्पष्टीकरण मागितले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून पुणे पोलिसांनी पत्र लिहिलं आहे. गर्भवतीला महिलेला तातडीने उपचाराची गरज असताना देखील तिला साडे पाच तास बसवून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अवघ्या ६ महिन्यात वाढले दीड लाख मतदार; पुण्यात ‘या’ भागात सर्वात जास्त मतदार
-‘रुग्णालयाकडून ४८ तासात कर वसूल करा नाही तर मी..’; सुप्रिया सुळेंचा इशारा
-तनिषा भिसे मृत्यू प्रकरण: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास यांचा राजीनामा