पुणे : पुण्यातील नामांकित रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पैशाच्या हव्यासापोटी एक गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या २ दिवसांपूर्वी घडली. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आता मोठी अपटेड समोर येत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा दिला आहे.
रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे शहरातील सर्व राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. रुग्णालयाबाहेर तसेच रुग्णालयाच्या गच्चीवर चढून आंदोलन करण्यात आले. रुग्णालयाच्या पाट्यांना काळं फासलं गेलं, शाईफेक करण्यात आली, अशा प्रकारे रुग्णालयाची प्रचंड बदनामी झाली. त्यातच राज्य सरकारकडून या संदर्भात चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीचा अहवाल सादर होण्यापूर्वीच रुग्णालयाने आणखी एक प्रताप केला. रुग्णालय प्रशासनाने सर्व जबाबदारी रुग्णाच्या नातेवारईंवर ढकलून स्वत:च स्वत:ला क्लीन चीट देण्याचा पराक्रम केला.
आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर महत्वाची बैठक पार पडली आहे. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी माध्यमांसोर येत अहवाल सादर केला. या अहवालामध्ये रुग्णालयाच चूक असल्याचे सांगितले. त्यानंतर आता रुग्णालय प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा दिला आहे. घैसास यांचा राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केला आहे. डॉ. घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या-
-‘हिंदूंनी हिंदूंना मारायचं अन् औरंगजेबाचा विषय चर्चेला आणायचा’; माजी महापौरांचं वक्तव्य
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच?, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चूक ते चूकच’
-आधी चिल्लर फेकली आता शेण फासणार; दीनानाथ रुग्णालयाविरोधात आंदोलक आक्रमक