पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या लालचीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती नेमली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल’, असा आश्वासन दिले आहे. तरीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुग्णालयातील संचालकांवर कारवाई करणार नाहीत, असा आरोप पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी केला आहे.
“मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर ‘आरएसएस’च्या संबंधित एकातरी संचालकाला अटक करून दाखवावी मी पाच लाख रुपयांची देणगी गोळा करून ससून रुग्णालयाला देईल. ते रुग्णालय प्रशासनावर कोणी कारवाई करणार नाही ते फक्त बोलबच्चन आहेत. हिंदूंनी हिंदूंना मारला आहे. ज्या माऊलीचं निधन झाल्यात ती देखील हिंदू होती, त्यामुळे हिंदूंनी हिंदूंना मारायचं आणि औरंगजेबाचा विषय चर्चेला आणायचा असलं राजकारण हाणून पाडणे आवश्यक आहे”, असे शांतीलाल सुरतवाला म्हणाले आहेत.
“मुख्यमंत्र्यांना या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी एक महिन्याचा अवधी द्यावा आणि जर त्यांनी कारवाई नाही केली तर त्यांना घरी बसवावं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जागा आमचे नेते शरद पवार यांनी या रुग्णालयाला दिली आहे. मात्र दीनानाथ मंगेशकर ट्रस्टने ही जागा आरएसएसच्या संबंधित असलेल्या लोकांना बहाल केली आहे. महाराष्ट्र सरकारने दिलेली जागा दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार कोणालाच नसतो आम्हाला कायदा माहित आहे”, असे शांतीलाल सुरतवाला म्हणाले आहेत.
‘या जागेत चाललेले गैर व्यवहार लोकांना कळले पाहिजेत. या रुग्णालायमध्ये माझंही ऑपरेशन झाला आहे. केमोच्या आठ थेरप्या त्या ठिकाणी मी घेतले आहेत. पुणे शहराचा महापौर असताना देखील सकाळी आठ वाजता त्या ठिकाणी रूम मिळवण्यासाठी मी रांगेत उभा राहिलो आहे. अख्या जगात दीनानाथ मंगेशकर हे एकच हॉस्पिटल आहे. ज्या ठिकाणी दोन दिवस किंवा तीन दिवस आधी रूम बुक केल्या जात नाहीत. भिकाऱ्यासारखं हॉस्पिटलच्या रांगेमध्ये उभं राहावं लागतं”, असेही सुरतवाला म्हणाले आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी पहाटे पाच साडेपाच वाजता पोरा बाळांसह भिकाऱ्यासारखा त्या ठिकाणी येऊन बसलेला असतो. डॉक्टर त्याचे पैसे घेतो मात्र इतर सर्व पैसे मॅनेजमेंटकडून वसूल केले जातात. रुग्णालयातील स्टाफ, नर्स, डॉक्टर चांगले आहेत. मात्र मॅनेजमेंटने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संपूर्ण व्यापारीकरण करून ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच?, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चूक ते चूकच’
-आधी चिल्लर फेकली आता शेण फासणार; दीनानाथ रुग्णालयाविरोधात आंदोलक आक्रमक
-रुग्णांकडून लाखोंचे बिल घेणाऱ्या दीनानाथ हॉस्पिटलने थकवली कोट्यवधीचा कर, नेमका आकडा किती?
-‘डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’, म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चिल्लर फेक