पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या पैशाच्या हव्यासापायी एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागाला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला आधी २० लाख रुपये भरा मग उपचार करु, असे सांगत रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केली. परिणामी या महिलेला आपला जीव गमावावा लागला. तिने मरण्यापूर्वी २ जुळ्या आपत्यांना जन्म दिला आहे. त्या गर्भधारणेचे महिने पूर्ण होण्याआधी जन्माला आल्यामुळे दोन्ही बाळांवर व्हेंटिलेटवर उपचार सुरु आहेत. सध्या या दोन्हीही बाळांची प्रकृती ठीक आहे. मात्र जन्माला येताच आईचं छत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लग्नानंतर तब्बल ८ वर्षांनंतर पहिल्यांदाच ही तनिषा सुशांत भिसे ही आई होणार होती. मात्र, रुग्णालयाच्या या कारनाम्याने तिच्या आनंदावर विरजण घातल्याचं पहायला मिळत आहे. अशातच रुग्णालयाच्या या वागणूकीमुळे पुणे शहरातील प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले आहे. तसेच काँग्रेसने देखील रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक केली आहे. तसेच रुग्णालयाच्या ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
आज दिवसभर रुग्णालयाबाहेर विविध राजकीय पदाधिकाऱ्यांचे तसेच सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून देखील देखील रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या कारभाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेना आणि शिंदे यांचे शिवसेना देखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. रुग्णलयातील अधिकारी माध्यमांशी तसेच आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला आले त्यावेळी या अधिकाऱ्यांवर आंदोलकांनी चिल्लर फेकली. रुग्णालयाच्या बेफिकीरीवर मंगेशकर कुटुंबांने उत्तर देण्याची मागणी करण्यात येते आहे. त्यानंतर काही वेळाने आंदोलकांनी इथला अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यावेळी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पतीत पावन संघटनेकडून रुग्णालयाच्या बोर्डाला काळ फासण्यात आलं.
रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आता आंदोलकांनी केली आहे. रुग्णालय प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पैशांचा बाजार झाल्या इथे पैशांचा बाजार झाल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मंगेशकर रुग्णालयाची स्वतःलाच क्लीनचीट, ‘ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून त्यांनी…”
-हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार