पुणे : देशातील पहिले सहकारी विद्यापीठ असलेल्या ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठा’चे विधेयक लोकसभेत तसेच राज्यसभे देखील मंजूर झाले. पुण्याचे खासदार आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत विधेयक मांडून चर्चेला उत्तर दिले. मुरलीधर मोहेळ यांनी यावेळी जवळपास ४० मिनिटे भाषण केले. या भाषणाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अत्यंत जवळचे मित्र मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांचे कोडकौतुक केले आहे.
काय आहे प्रवीण तरडेंची पोस्ट?
“माझा लाडका दोस्त आज देशाचा लाडका झाला.. देशाच्या सर्वोच्च सभागृहात आज तो बोलत होता तेंव्हा त्याचा अख्खा प्रवास आठवला.. मुळशीच्या मुठा गावातील जिल्हा परीषदेची शाळा .. शाळा सुटल्यावर स्वतःच्याच ऊसाच्या गुऱ्हाळात वडिलांना मदत..त्यानंतर मोठ्या कष्टाने कोल्हापूर मधे कुस्ती प्रशिक्षण शिवाय कुस्ती शिकता शिकता कला शाखेची पदवी.. त्यानंतर भाजपा सारख्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षात राजकीय पार्श्वभूमी नसताना एक कार्यकर्ता म्हणून प्रवेश..आणि मग तीस वर्षांचा एका कार्यकर्त्याचा प्रामाणिक संघर्ष आज दिल्लीत सोन्यासारखा चमकला.. पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश त्याला ऐकत होता .. या भाषणानंतर मोठमोठ्या दिग्गजांनी त्याची पाठ थोपटली.. मित्रा खुप मोठा झालायेस असाच होत राहशील.. कारण ही फक्त सुरवात आहे”
दरम्यान, प्रवीण तरडे यांनी ससंद टीव्ही वरील मुरलीधर मोहोळ यांच्या भाषणाची लिंक देखील शेअर केली आहे. प्रवीण तरडेंनी केलेल्या या कौतुकाच्या पोस्टवर अनेक कलाकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी, ‘प्रचंड अभिमान आहे’ अशी कमेंट केली आहे. तर, ‘मुरली अण्णांचा खरोखर अभिमान वाटतो. अण्णा मराठी माणसांसाठी एक प्रेरणास्थान आहेत’, अशा देखील प्रतिक्रिया प्रवीण तरडेंच्या पोस्टवर केल्याचे पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेसेनेत जाताच धंगेकरांचे हिंदुत्व जागे, अजितदादांना म्हणाले “त्या पदाधिकाऱ्याला हाकला..”
-पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे प्रशिक्षण
-पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या; मानकरांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट, केली ‘ही’ मागणी
-भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप; जीममध्ये मैत्री, प्रेमाचं जाळं अन्…