पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या शेतकरी कर्जमाफी, नागरीकांचे सामान्य प्रश्न, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार अशा अनेक प्रश्नांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णी सुरु आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या राज्य उपाध्याक्ष शंतनू कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शंतनू कुकडे याचा पुणे कॅम्प परिसरात आलीशान बंगला असून या बंगल्यात तो गरजू विद्यार्थांसाठी राहण्याची सोय करत असतो. काही महिन्यांपूर्वी या बंगल्यात दोन मुली राहण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी एक अल्पवयीन होती. या दोन मुलींनी समर्थ पोलिस स्टेशनमध्ये ‘शंतनू कुकडेने आपल्यावर बलात्कार केला’ असल्याची तक्रार केली आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर कुकडेवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय होता. त्यामुळे पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्षपद त्याच्याकडे सोपवण्यात आले होते.
पुण्यात एका बंगल्यात शंतनू डान्सबार चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याची देखील चर्चा आहे. मुलींचे धर्म परिवर्तन करण्यासाठी त्याला इंटरनॅशनल फंडिंग येत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी शंतनू कुकडे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. बंगल्याच्या मागे बियरच्या बाटल्या पडलेल्या पहायला मिळाल्या आहेत. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यानं पुण्यातल्या बंगल्यात डान्सबार चालवत असल्याचा आरोप आजूबाजूच्या नागरिकांकडूनही होत आहे. त्यामुळे आता कुडकेवर पक्षाकडून कोणती कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेसेनेत जाताच धंगेकरांचे हिंदुत्व जागे, अजितदादांना म्हणाले “त्या पदाधिकाऱ्याला हाकला..”
-पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे प्रशिक्षण
-पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या; मानकरांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट, केली ‘ही’ मागणी
-भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप; जीममध्ये मैत्री, प्रेमाचं जाळं अन्…
-कोल्हापूरचा पैलवान काँग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार, पक्षाने सोपवली खास जबाबदारी