पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (AP) आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. बनसोडेंच्या स्वागतासाठी पिंपरी शहरामध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे यांनी हजेरी लावली. त्यामुळे वाघेरे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
संजोग वाघेरे यांनी अण्णा बनसोडे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले त्यावरुन आता पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा रंगत आहे. संजोग वाघेरे यांनी शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्याविरोधात मावळ लोकसभा निवडणूक लढली होती. त्या निवडणूकीत वाघेरेंना परभव पत्कारावा लागला होता. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, याबाबत संजोग वाघेरेंना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजोग वाघेरे म्हणाले, ‘ शहराला २० वर्षानंतर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या रुपाने मोठं पद मिळालं, म्हणून त्यांचं अभिनंदन केलं, यापलीकडे त्या उपस्थितीचा अर्थ काढणं चुकीचं राहील. सध्या माझा तसा काही विचार नाही’, असे म्हणत त्यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप; जीममध्ये मैत्री, प्रेमाचं जाळं अन्…
-कोल्हापूरचा पैलवान काँग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार, पक्षाने सोपवली खास जबाबदारी
-भोंंदूबाबाचा महिलेवर लिंबू डाव अन् घातला लाखोंचा गंडा, नेमका काय प्रकार?
-पुणेकरांनो सावधान! शहरात ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज