पुणे : विद्याचे माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. महिला अत्याचार, गुन्हेगारी, खून, भोंदूगिरी, हत्या, अपहरण अशा घटना दररोज घडत आहेत. अशातच आता शहरातील माजी नगरसेविकेच्या मुलाने २८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेवर लैंगिक अत्याचार करून गर्भपात करायला लावल्याचंही समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर तिला धमकावून गर्भपात करायला सांगितला, अशी तक्रार पीडितेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरुन या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची २०२१ मध्ये एका जीममध्ये ओळख झाली होती. पीडित तरुणीचा व्यवसाय आहे. ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीमध्ये झालं. त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी देखील जात असे. कालातरांने तरूणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली, त्यावेळी त्याने टाळाटाळ करायला सुरूवात केली. आरोपीचे अन्य मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तरुणीला होता. याबाबत तिने विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ करून धमकावलं. तिला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले, असे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या सगळ्या प्रकाराबाबत तरुणीने तिच्या आईला सांगितले. १७ डिसेंबर २०२२ ला तरुणाने पीडितेशी मोबाईलवर संपर्क साधला. ‘मला शेवटचे भेटायचे आहे. न भेटल्यास कुटुंबियांना संपवून टाकेन’ अशी धमकी त्याने दिली. याबद्दल तरुणीने माजी नगरसेविकेला सांगितले. तेव्हा तिला पुन्हा धमकावले. त्यानंतर आरोपीने पीडितेला भेटून विवाह करण्याचे आश्वासन दिले. विवाहाचे आमिष दाखवून आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. मात्र कुटुंबिय ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून त्यांचा विवाहास नकार असल्याचे सांगत त्याने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचंही पीडितेने सांगितलं आहे.
२०२४ मध्येही तरुणी पुन्हा एकदा गर्भवती राहिली त्यावेळीही गर्भपातच्या गोळ्या दिल्या. हा सगळा प्रकार तरुणीने घरी सांगितला. १६ फेब्रुवारी २०२५ ला पीडितेला घेऊन आरोपी आळंदीला गेला. आळंदीमध्ये जाऊन लग्न केल्याचंही पीडितेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या सगळ्या दरम्यान तरुणीला अजून गर्भपातच्या गोळ्या दिल्या. ती या घटनेने घाबरून आजीच्या गावी गेली आणि पुण्यात परतल्यावर तिने पोलिसात तक्रार दिली असल्याच तरुणीने तक्रारीत सांगितले आहे. या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कोल्हापूरचा पैलवान काँग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार, पक्षाने सोपवली खास जबाबदारी
-भोंंदूबाबाचा महिलेवर लिंबू डाव अन् घातला लाखोंचा गंडा, नेमका काय प्रकार?
-पुणेकरांनो सावधान! शहरात ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज