पुणे : सुसंस्कृत, पुरोगामी महाराष्ट्र आणि सांस्कृतिक वारसा लाभेलेल्या पुणे शहरामध्ये गुडीपाडव्याच्या दिवशी माजी महापौर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बंगल्याबाहेर काळी जादू केल्याचा भयंकर प्रकार घडला. धनकवडी भागामध्ये गेल्या ४ महिन्यापासून फक्त अमावस्याच्या दिवशी वेगवेगळया व्यक्तींच्या घरासमोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबू, काळा अभिर ठेवल्याचे आढळले होते. यामुळे परिसरातील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यााबाबत अनेक तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. अखेर आज पोलिसांनी एका महिलेला या प्रकरणात अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला धनकवडी परिसरातील एका सोसायटीमध्ये गेल्या चार महिन्यापासून फक्त अमावस्याच्या दिवशी वेगवेगळया व्यक्तीच्या घराचे समोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबू, काळा अभिर ठेवत होती तसेच शनिवार २९ तारखेला रात्री ८ च्या सुमारास अमावस्याच्या दिवशी पुन्हा एकदा असाच प्रकार या महिलेने केला. सदर महिला हिने दत्ता धनकवडे यांच्या बंगल्याचे समोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबू, काळा अभिर ठेवला. यावेळी परिसरातील नागिरकांनी तिला हा धक्कादायक प्रकार करताना पाहिले आणि पोलिसांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी पोहचले आणि अखेर आज या महिलेला अटक करण्यात आली आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विवेक नामदेव पाटील (वय ६२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिला मागील चार महिन्यांपासून विद्यापीठ गृहसंस्था मर्यादित संकुलात रात्रीच्या वेळी संशयास्पद वक्तव्ये करत होती. ज्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील डॉक्टरचा प्रताप; पहिलं लग्न लपवलं दुसरंही केलं अन्…
-पुण्यातील बड्या नेत्याच्या घराबाहेर जादूटोणा, नेमका प्रकार काय?
-रमाजान ईदनिमित्त शहरातील ‘या’ भागातील वाहतूकीत बदल
-मुंडेंनी मुलांचा स्विकार केला पत्नीचा का नाही?, तृप्ती देसाईंचा आक्रमक सवाल
-आमदार झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात हेमंत रासनेंची प्रभावी कामगिरी