पुणे : धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे साजरी केली जात आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शंभू महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. अशातच गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीजवळ असणाऱ्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक आणि औरंगजेबाची कबर यावरुन राज्याच्या राजकारणात मोठा वाद सुरु आहे. अशातच आता उदयनराजे भोसले यांनी सातत्याने होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानावरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
“औरंगजेबाच स्टेटस ठेणाऱ्यांना देशाच्या बाहेर पाठवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आमचं सगळं ऐकलं पाहिजे. असा अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं. अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री अन् सरकार काय बोळ्याने दूध पितात का?” असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी सरकारलाच सुनावले आहे.
“ज्या स्वराज्यात आपण सगळे राहतोय त्या स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांची होती. सर्वधर्मसमभाव ही भावना घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे एकत्र आणले. लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. आपल्यातल्या कोणीच देव बघितला नाही. शिवाजी महाराजांच्या रूपाने देव निश्चित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अनेक युगपुरुष जन्माला आले त्यांच्या संरक्षण करण्यासाठी कायदे निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती महाराज यांच्या संदर्भात अनेकदा मी सांगून सुद्धा कोणतेही कायदे निर्माण झाले नाही. कायदा तयार करायला बजेटची गरज नाही. अवमान करणाऱ्यावर मोकासारखा कायदा आहे. तो लागू झाला पाहिजे” अशी मागणी यावेळी उदयनराजे भोसलेंनी केली आहे.
“आपले लोकप्रतिनिधींना शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान व्हावं असं वाटतं का? त्यांना जर तसं वाटत नसेल तर त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीने सिद्ध केले पाहिजे. मात्र आंतरराष्ट्रीय स्मारकसाठी काही तरतूद नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा शासन मान्य इतिहास प्रकाशित झाला नाही. त्यानंतर झालेल्यांचे पुस्तके प्रकाशित झाले आहे”, असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘असा चमत्कार झाला तरच नमस्कार होणार’; विजय शिवतारेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान
-‘बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही’- अजित पवार
-विधानसेभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड, मात्र आता आमदारकी धोक्यात; नेमकं कारण काय?
-कर्जमाफी नाहीच! ‘३१ तारखेच्या आत शेतकऱ्यांनो पिककर्जाचे पैसे भरा’- अजित पवार
-स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेचे पोलिसांवर गंभीर आरोप, थेट राज्याच्या सचिवांना लिहलं पत्र