पुणे : पुणे शहरात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी तसेच पक्षसंघटनेसाठी शिंदे गटाकडून आज संवाद बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमामध्येउद्योग आणि मराठी भाषा, मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपासभापती निलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शिवसेना नेते रवींद्र धंगेकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना विजय शिवतारे यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ऐतिहासिक सभा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच शिवतारेंनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल देखील सुनावल्याचे पहायला मिळाले आहे.
‘शो’बाजी करून निवडणुका जिंकता येणार नाहीत. काम पाहिजे, पक्ष बांधला पाहिजे. बूथ मजबूत बांधा. मतदार यादीवर काम करा. प्रत्येक मतदारसंघात पोहोचा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा. वेळ कमी आहे. महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असं वाटत आहे. हवेत आणि पोस्टर्स लावून यश मिळणार नाही, त्यासाठी काम करावे लागेल. संघटीत पद्धतीने काम करा, तरच निवडणूक जिंकता येतील, असे म्हणत आमदार विजय शिवतारे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना सुनावले आहे.
‘पुणे शहराबाबत माझी एक खंत आहे. मी पुरंदर तालुक्यात सभा घेतल्या, त्या प्रचंड तुडुंब झाल्या. पण, पुणे शहरात अशी एकही सभा झाली नाही. माझं एक स्वप्न आहे की, पुणे शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एवढी मोठी सभा झाली पाहिजे की, इतिहासात अशी सभा कुठेच झाली नसेल. असा चमत्कार झाला तरच नमस्कार होणार आहे. पुण्यातील लोकांना कळलं पाहिजे की, एकनाथ शिंदेंचे पुणे शहराच्या विकासाकडेही तेवढचं लक्ष आहे’, असे म्हणत आमदार विजय शिवतारे यांनी चांगलेच कान टोचल्याचे पहायला मिळाले.
‘पुरंदरमध्ये शिवसेना येऊ नये, म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २०१८ ला प्रचाराची शेवटची सभा पुरंदर येथे घेतली होती. माझ्या सभेला गर्दी होऊ नये, म्हणून त्याच दिवशी त्यावेळी सभा घेतली. पण, तब्बल २६ हजार मतांनी आपण ती निवडणूक जिंकली’, असे म्हणत शिवतारेंनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या-
-‘बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही’- अजित पवार
-विधानसेभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड, मात्र आता आमदारकी धोक्यात; नेमकं कारण काय?
-कर्जमाफी नाहीच! ‘३१ तारखेच्या आत शेतकऱ्यांनो पिककर्जाचे पैसे भरा’- अजित पवार
-स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेचे पोलिसांवर गंभीर आरोप, थेट राज्याच्या सचिवांना लिहलं पत्र
-पोर्शे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; ‘हे’ २ पोलीस अधिकारी होणार बडतर्फी?