Entertainment News : आपल्या पहिल्याच चित्रपटसृष्टीत ‘घरात गणपती’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केल्याचे पहायला मिळाले आहे. एचबीओच्या लोकप्रिय सिरीज ‘द व्हाईट लोटस’ पासून प्रेरित, ही भव्य थीम-पार्टी पाहुण्यांना थेट या मालिकेच्या समृद्ध, विलासी आणि ट्रॉपिकल जगात घेऊन गेली. एका आलिशान हाय-राईज रूफटॉपवर रंगलेल्या या सोहळ्यात सिनेमॅटिक भव्यता आणि वास्तवातील ऐश्वर्य यांचा अनोखा मिलाफ पहायला मिळला.
या सोहळ्यामध्ये सजावट, खास थीमवर आधारित कॉकटेल्स आणि मालिकेतील पात्रांप्रमाणे ड्रेस कोड, यामुळे संपूर्ण वातावरण ‘The White Lotus’ च्या जगात हरवून गेलं होतं. पाहुण्यांनीही मालिकेतील पात्रांप्रमाणे भव्य रिसॉर्ट लूक आणि उत्साही व्यक्तिमत्त्व साकारून थीममध्ये चार चाँद लावले. या खास सोहळ्यासाठी महेश मांजरेकर, अनुषा दांडेकर, सुनील बर्वे, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर आणि इंडस्ट्रीतील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. वातावरण आलिशान असतानाही तितकंच उत्स्फूर्त होतं गप्पा, हशा आणि खास थीम असलेले पेय यांची रेलचेल होती.
नवज्योत बांदिवडेकर, ज्यांनी आपल्या पुरस्कार विजेत्या पहिल्याच चित्रपटाने इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे, त्यांना बारकाव्यांकडे विशेष लक्ष देण्याची सवय आहे आणि याची झलक त्यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यातही दिसून आली. घरात गणपती या चित्रपटाने त्यांना IFFI 2024 Award for Best Debut Director मिळवून दिला, आणि गेल्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठी चित्रपटांपैकी हा एक ठरला आहे.
मात्र, The White Lotus मालिकेतील नाट्यमय ट्विस्ट्सच्या तुलनेत या रात्रीत कोणताही ड्रामा नव्हता. फक्त उत्तम सोबत, छान संगीत आणि एखाद्या सिनेमातील स्वप्नवत क्षणांसारखं वातावरण होतं. फिल्ममेकिंगसारख्याच त्यांच्या उत्कृष्ट सृजनशीलतेचा प्रत्यय या पार्टीतही आला, कारण नवज्योत बांदिवडेकर फक्त सिनेमाच्या पडद्यावरच नाही तर प्रत्यक्षातही एक परिपूर्ण सेट तयार करतात.
महत्वाच्या बातम्या-
-सोशल मीडियावर मैत्री पडली महागात; ६ जणांनी बोलावून घेतलं, त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढले अन्…
-स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण करुन मारहाण, नेमकं कारण काय?
-गावातील समलैंगिक संबंध ठरलं त्याच्या शेवटाचं कारण; गोड बोलून भेटायला बोलवलं अन्…
-पोर्शे कार प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरु होणार; सरकारी वकील कोण असणार?
-तृप्ती देसाई बीडमध्ये दाखल; ‘त्या’ 26 अधिकाऱ्यांविरोधातले पुराव्यांचा पेन ड्राईव्ह केला सादर