पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारी काही केल्या संपताना दिसत नाहीये. पुणे शहराची गुन्हेगारीचं शहर अशी बनत चालली आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात देखील गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका तरुणाला सोशल मीडियावर मैत्री करणं चांगलंच महागात पडलं आहे. एका २१ वर्षीय तरुणाने शहरातील संत तुकाराम मेट्रो स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
सुजल सुनील मानकर (वय २१) या तरुणाची एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ६ तरुणांसोबत ओळख झाली, चांगली मैत्रीही झाली. मैत्री झाली म्हणून या ६ तरुणांनी त्याला २४ फेब्रुवारीला पिंपरीमध्ये भेटण्यासाठी बोलावून घेतलं. तिथे त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर ही धमकी वारंवार देत त्याच्याकडून पैसे उकळले. एकवेळा पैसे दिल्यानंतर ही ब्लॅकमेलिंग करणं थांबवलं नाही. अखेर धमक्यांना कंटाळून सुजलने आयुष्य संपवण्याचा विचार करत टोकाचं पाऊल उचललं.
दरम्यान, याप्रकरणी सुजल याचे वडील सुनील बाजीराव मनकर (४७, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव किशोर शिंदे (वय २१), नितीन पाटील (वय २२), संदीप रोकडे (वय २०), आकाश चौरे (वय २०, चौघे रा. महेशनगर पिंपरी. मूळ रा. धुळे), लोपेश राजू पाटील (वय २०, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. पातोंडा, जळगाव), प्रथमेश परशुराम जाधव (वय १९, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. सातारा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण करुन मारहाण, नेमकं कारण काय?
-गावातील समलैंगिक संबंध ठरलं त्याच्या शेवटाचं कारण; गोड बोलून भेटायला बोलवलं अन्…
-पोर्शे कार प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरु होणार; सरकारी वकील कोण असणार?
-तृप्ती देसाई बीडमध्ये दाखल; ‘त्या’ 26 अधिकाऱ्यांविरोधातले पुराव्यांचा पेन ड्राईव्ह केला सादर
-‘त्यांनी ‘जय शिवराय’ नाही, तर ‘अल्ला हू अकबर’ म्हणावं’; नितेश राणेंनी राष्ट्रवादीला डिवचलं