पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. गुंड गजा मारणेवर कारवाई करत त्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी येरवडाच्या कारागृहामध्ये केली होती. मात्र आता गजा मारणेला सांगलीच्या कारागृहात आणण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कोथरूड परिसरात गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला त्याला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी गजा आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करत ३ मार्चपर्यंत मारणेला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, त्याची अचानक सांगलीच्या कारागृहात रवानगी का केली? असा सवाल उपस्थित होत आहे.
गजा मारणेची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली असून त्याला बॅरॅक असलेल्या कारागृहामध्ये ठेवण्यात आले आहे. त्याला ज्या कोठडीत ठेवण्यात आले आहे त्या बाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यामुळे कारागृह प्रशासन आता अलर्ट मोडवर आले असून कारागृहातील सर्व वॉट्स टॉवरवर बंदोबस्त आहे. कारागृहाच्या भिंतीवर कार्यन्वित असणारे इलेक्ट्रिक करंट कुंपण देखील सुरू करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेंना पुण्यात दुसरी लॉटरी; धंगेकरांनंतर आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या गळाला
-स्वारगेट डेपो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर; महिला प्रवासी स्टँडमध्ये असताना मध्यरात्री अचानक…
-हलाल, झटका मटणावरुन राजकारणात मोठा वाद; ‘मल्हार’ सर्टिफिकेशनवरून जेजुरी संस्थान विश्वस्तांचा विरोध
-‘त्यांनी अजितदादांना जेलच्या दारावर बसवलं होतं’; धंगेकर हे काय बोलून गेले?
-गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडी; जामीन मिळणार का? न्यायालयात नेमकं काय घडलं?