पुणे : कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा हात सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. धंगेकरांनी पक्षाला रामराम केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे धंगेकरांच्या जाण्याने पक्षाला काहीच फरक पडणार नाही असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेत ठाकरेंच्या शिवसेनेतील एका बड्या नेत्याची एन्ट्री होणार आहे. शिवसेनेच्या (उबाठा) महिला नेत्या संघटिका सुलभा उबाळे या आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती सुलभा उबाळे यांनी सांगितले आहे.
‘शहरातील तीनही मतदार संघ पक्षाने सोडून दिल्यामुळे शहरात पक्षाचे अस्तित्वचं शिल्लक नाही, पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहे’ असे सुलभा उबाळे म्हणाल्या आहेत.
कोण आहेत सुलभा उबाळे?
सुलभा उबाळे यांच्या राजकीय कारकीर्दीला १९९२ मध्ये शिवसेना शाखा प्रमुख म्हणून झाली. त्यांना प्रभागातील जनतेने त्यांना १९९७ साली नगरसेवक म्हणून निवडून दिले. १९९८ साली विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्या १९९९ साली उपसभापती, २००१ साली अ प्रभाग समिती, २००७ ते २०१२ साली शिवसेना गटनेता, स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. २००९ साली सुलभा उबाळे यांचा भोसरी विधानसभा निवडणुकीत अवघ्या १२७२ मतांनी पराभव झाला. २०१४ ते २०१७ साली त्या गटनेता आणि २०१४ साली पुन्हा भोसरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी १५,६४१ मतांनी पराभूत झाल्या. शिवसेना शहर संघटिका पिंपरी चिंचवड म्हणून ५ वर्ष काम पाहिलं. तसेच जिल्हा संघटिका म्हणून २०१७ ते आजतगायत कार्यरत होत्या. त्यांनी आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्याचा विचार केला असून त्या आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट डेपो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर; महिला प्रवासी स्टँडमध्ये असताना मध्यरात्री अचानक…
-हलाल, झटका मटणावरुन राजकारणात मोठा वाद; ‘मल्हार’ सर्टिफिकेशनवरून जेजुरी संस्थान विश्वस्तांचा विरोध
-‘त्यांनी अजितदादांना जेलच्या दारावर बसवलं होतं’; धंगेकर हे काय बोलून गेले?
-गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडी; जामीन मिळणार का? न्यायालयात नेमकं काय घडलं?
-‘धंगेकर पुण्याचे वाल्मिक कराड’; काँग्रेस नेत्याची धंगेरकरांवर टीकेची झोड