पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकावर संपूर्ण शहरासह राज्याला हादरुन सोडणारी घटना घडली. एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. या धक्कादायक प्रकारने संपूर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली. या प्रकरणात पुणे पोलिस आणि स्वारगेट बस आगाराचे अक्षरश: धिंडवडे काढले गेले. त्यानंतर पुणे पोलिसांनी स्वारगेट बस स्थानकावर कडक बंदोबस्त करण्यात आला. राज्याला हादरुन सोडणारी, माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलेलं स्वारगेट बसस्थानक मात्र अद्यापही अंधारातच असल्याचे पहायला मिळाले आहे.
२६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने स्वारगेट बस डेपोमध्ये काही बंद पडलेल्या बसचा अक्षरश: लॉजिंगसारखा वापर केला जात होता. या बसेसमध्ये वापरलेले कंडोम, साड्या, अंतर्वस्त्रे पडलेले, जीन्स तसेच चादर असल्याचे देखील पहायला मिळाले होते. तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर माध्यमांकडून या सगळ्या घटनांचा पर्दाफाश करण्यात आला. शिवसेना (उबाठा) नेते वसंत मोरे यांनी देखील आगारातील संरक्षण कक्षावर आक्षेप घेत तोडफोड केल्याचे पहायला मिळाले. विविध पक्षांच्या राजकीय नेते, पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. मात्र तरीही बसस्थानकावर अद्याप वीज नसून स्थानकात काळोख कायम असल्याचे पहायला मिळत आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरण ताजे असताना स्वारगेट बस स्टँडवर मध्यरात्री वीज नसल्याने स्वारगेट डेपो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. स्वारगेट बस स्थानकातील वीज मध्यरात्री बंद केली जात असून डेपो प्रशासन मात्र झोपलेलं दिसून आले आहे. काल मध्यरात्री स्थानकामधील लाईट अचानक बंद केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वारगेट बस स्टॅन्डमध्ये रात्री महिला प्रवासी असताना देखील बस स्टॅन्डवर काळोख पहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकारावरुन आता स्वारगेट बस डेपो प्रशासन आणखी अनुचित घटना होण्याची वाट पाहतोय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हलाल, झटका मटणावरुन राजकारणात मोठा वाद; ‘मल्हार’ सर्टिफिकेशनवरून जेजुरी संस्थान विश्वस्तांचा विरोध
-‘त्यांनी अजितदादांना जेलच्या दारावर बसवलं होतं’; धंगेकर हे काय बोलून गेले?
-गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडी; जामीन मिळणार का? न्यायालयात नेमकं काय घडलं?
-‘धंगेकर पुण्याचे वाल्मिक कराड’; काँग्रेस नेत्याची धंगेरकरांवर टीकेची झोड
-मेट्रो मार्गावर आंदोलनाचा मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु, न्यायालयात नेमकं काय झालं?