पुणे : माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. रुबीहॉल हॉस्पिटलकडून त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, ‘न्यूज १८ लोकमत’च्या वृत्तानुसार, उषा काकडे यांनी झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्याचे सांगण्यात आले आहे.
रुबी हॉलचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी उषा काकडे यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती दिली आहे. दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास ही घटना घडली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या उषा काकडे यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, उषा काकडे या ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय असतात.
महत्वाच्या बातम्या-
-लेकाच्या संतापजनक कृत्यावर बापाची प्रतिक्रिया; ‘तो माझा मुलगा, त्याने सिग्नलवर नाही तर माझ्या…’
-बड्या बापाच्या लेकाचा माज; दारुच्या नशेत रस्त्यावर अश्लील चाळे, पाहा व्हिडीओ
-स्वारगेट अत्याचार: ‘माझ्या बदनामीला जबाबदार कोण?’ पीडितेच्या प्रश्नावर पोलीस काय म्हणाले?
-पुण्याला मिळणार आणखी एक आमदार; मानकर अन् मुळीकांच्या नावाची जोरदार चर्चा