पुणे : पुणे शहरातील विशेषत: गावठाण भाग असणाऱ्या पेठांमधील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्याची आग्रही भूमिका कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी घेतली आहे. या संदर्भात रासनेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शासकीय धोरणामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ठाणे तसेच मुंबईमध्ये करण्यात आलेल्या सुधारित धोरणांच्या धर्तीवर पुणे शहरासाठी स्वतंत्र सुधारित धोरण राबवावे. सोबतच कसबा मतदारसंघाला संपूर्ण झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्रक्रिया देखील सुलभ करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.
शहरातील अनेक जुन्या वाड्यांचे बांधकाम अतिशय जिर्ण झाल्याने नागरिकांना धोकादायक परिस्थितीत राहावे लागत आहे. विद्यमान नियमांमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे वाड्यांच्या पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहरात राबवण्यात आलेल्या धोरणानुसार पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी. यासाठी संबंधित विभागाची उच्चस्तरीय बैठक आयोजित करून हजारो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय सोडवण्याला गती देण्याची मागणी रासने यांनी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहनिर्माण आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“पुणे शहर आणि कसबा मतदारसंघातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच योग्य कार्यवाही होईल”, असे हेमंत रासने म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याला मिळणार आणखी एक आमदार; मानकर अन् मुळीकांच्या नावाची जोरदार चर्चा
-‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ
-रात्री बाराचा ठोका अन् गुन्हेगारांनी केलं पोलिसांचं बर्थ-डे सेलिब्रेशन; बीडलाही टाकलं मागं
-पुण्यात आढळला मानवी हाडांचा सांगाडा, मोबाईल अन् आधारकार्डही; पुढे काय घडलं?
-गोरे म्हणाले ‘त्या प्रकरणी माझी निर्दोष मुक्तता’, पीडित महिला म्हणाली, ‘ही केस…’