मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी या प्रकरणी न्यायालयामध्ये खटला चालला असून संबंधित डेटा (फोटो) डिलीट करुन गोरेंची निर्देष मुक्तता केली होती. मात्र आता २ दिवसांपासून या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा जयकुमार गोरेंना टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. महिलेला नग्न फोटो पाठवल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता झालेल्या गोर यांच्या विरोधात संबंधित महिला १७ तारखेपासून उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता गोरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
‘मला या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. तरीही मी शांत होते. मला ज्यावेळी पत्र आलं त्यावेळी मी मला त्रास होतोय यासाठी कलेक्टर ऑफिसला दिवसभर थांबून कलेक्टरांना ही सर्व हकीकत सांगितली. त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांना सांगितली. मात्र, माझी कोणी दखल घेतली नाही किंवा या गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलीस आले नसल्याचे देखील यावेळी महिलेने सांगितले. त्यामुळे मी १७ तारखेला माझी बदनामी होत असल्याने उपोषण करणार असल्याचा निर्णयावर ठाम आहे’, असे संबंधित महिलेने सांगितले आहे.
“2019 साली जयकुमार गोरेला शपथविधीसाठी केस आडवी येत होती, तेव्हा त्यांनी मला प्रेशर आणलं. आम्ही तुम्हाला जीवे मारु, कुटुंबाला त्रास देऊ, अशी धमकी मला देण्यात आली. त्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये मी ती केस मागे घेतली. मी केस करताना डगमगले नाही, मी तेव्हाही डगमगले नाही. मी म्हणाले की, मला लेखी लिहून हवं की, मी पुन्हा असं करणार नाही. कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. मग जयकुमार गोरे यांनी मला माफीनामा लिहून दिला. त्यावेळी कोर्टाच्या चेंबरमध्ये जिथे मी भावासोबत बोलत होतो, तेव्हा गोरे यांनी मला दंडवत घातला होता. मला वाटलं एवढी शिक्षा झाल्यावर हा पुन्हा असं करणार नाही. त्यामुळे चांगुलपणाच्या भावनेतून मी ते केस मागे घेतली. अन्यथा जयकुमार गोरे या केसमधून निर्दोष सुटले नसते”, असे या महिलेने सांगितले आहे.
‘ही केस निर्दोष सुटण्यासारखी नव्हती. काल जयकुमार गोरे पेपर दाखवत होते, मला निर्दोष सोडण्यात आले आहे. पण जयकुमार गोरे निर्दोष असता तर पोलिसांनी 10 दिवस तुरुंगात का ठेवलं? मुंबई उच्च न्यायालयाने तुझा जामीन अर्ज का फेटाळला? सातारच्या कोर्टात अटकपूर्व जामीन का फेटाळला, पोलीस ठाण्यात उपस्थित राहिल्यावर गोरेला जामीन मिळाला. मी त्यावेळी उपकार करुन सोडलं, तर तू मलाच पुन्हा त्रास द्यायला लागला. त्याला कंटाळून मी पुन्हा संघर्ष करण्याचे ठरवले आहे’, असे संबंधित महिलेने सांगितले.
दरम्यान, जयकुमार गोरे यांच्यावर या प्रकरणावर आरोप, टीका करण्यात आल्यानंतर गोरेंनी माध्यमांसमोर येत कागदपत्रे दाखवली आणि आपली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असल्याचे सांगितल्यामुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. संबंधित महिलेकडून जयकुमार गोरेंची निर्दोष मुक्तता न झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: नराधम दत्ता गाडेच्या चौकशीत धक्कादायक फोटो आले समोर
-धक्कादायक! एक दिवसाच्या बाळाचा मृतदेह कब्रस्तानातून गायब; पुण्यात नेमकं काय घडलं?
-साखरपुडा सुरु असताना पोहचली प्रेयसी, मुलाची नाही तर मुलीची प्रेयसी, अन्… पुढे काय झालं?
-पुण्यात नेमकं चाललंय काय? खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण