पुणे : पुण्यातील रामवाडी भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक मुस्लिम कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलेल्या एका दिवसाच्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
रामवाडीत राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबातील नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या भागातील कब्रस्तानमध्ये त्याचे दफन विधी पार पडले. मात्र, दुसऱ्या दिवशी कब्रस्तानमध्ये मृतदेहाचा कुठेही मागमूस नव्हता. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरातही खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरातही खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मृतदेह कोणत्या प्राण्याने काढला की कोणीतरी जाणूनबुजून चोरून नेला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे मृत बाळाला आधीच गमावलेल्या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे महापालिकेवर आरोप केला आहे.
“महापालिकेचे साडेबारा हजार कोटींचे बजेट असताना शहरातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत अशा सर्व स्मशानभूमींना आवश्यक सुरक्षा पुरवली जात नाही. जर कब्रस्तानमधून मृतदेह गायब होत असतील, तर याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी,” असे प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-साखरपुडा सुरु असताना पोहचली प्रेयसी, मुलाची नाही तर मुलीची प्रेयसी, अन्… पुढे काय झालं?
-पुण्यात नेमकं चाललंय काय? खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण
-धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं आता आमदारकीही जाणार? धक्कादायक माहिती आली समोर
-नैतिकतेच्या आधारावर राजीनामा, पक्षाकडून पत्रक जारी; मुंडेंचा राजीनाम्याचं नेमकं कारण काय?