पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून धनंजय मुंडेंना कार्यमुक्त केल्याची घोषणा करण्यात आली.
धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे. पण आता धनंजय मुंडेंच्या आमदारकीचं आता पुढे काय होणार? धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार का? असे प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. मात्र धनंजय मुंडेंची आमदराकी सध्यातरी रद्द होणार नाही तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना तूर्त सहआरोपी केले जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.
धनंजय मुंडे मंत्रिपदावर राहिल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही, असा आरोप विरोधकांकडून सतत करण्यात येत होता. विरोधकांच्या मंत्रिपद राजीनाम्याच्या मागणीनंतर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, आता चार्जशीटमध्ये मुंडेंच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाही. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कुठलीही कार्यवाही केली जाणार नाही.
राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नैतिकतेच्या आधारावर राजीनामा, पक्षाकडून पत्रक जारी; मुंडेंचा राजीनाम्याचं नेमकं कारण काय?
-मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं महागात; गुंड गजा मारणेची तरुंगात रवानगी
-रणवीर अलहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; ‘पॉडकास्ट सुरू करता येणार, पण…’
-स्वारगेट अत्याचार: तपासात दररोज नवे खुलासे; पुणे पोलिसांचा घेतला ‘हा’ मोठा निर्णय
-लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी, मार्चचा हफ्ता कधी जमा होणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची महिती