पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीतील चौघांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. आधीच शहरात छोटी-मोठी गुन्हेगारी सुरुच आहे अशातच मारणेच्या टोळीतील चौघांनी पुन्हा एकदा धूमाकूळ घातला आहे. केंद्रीय मंत्री मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याने मारणे टोळीच्या चौघांना अटक केली अन् गजा मारणेला देखील अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता गजा मारणेच्या टोळीमुळे कोथरुडमधील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे. यावरुन कोथरूड परिसरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. पोस्टरच्या माध्यमातून ‘कोथरूडचे बीड होण्यापासून वाचवावं’, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आले आहे.
कोथरुडमध्ये बॅनर लावून आवाहन
मा. मुख्यमंत्री, यांना पत्र कोथरूड च बीड होण्यापासून वाचवा, आमचं कोथरूड असं नव्हतं..!
- गुन्हेगारांना अभय कोण देत?
- त्यांना पैसा कोण पुरवत, पोशिंदा कोण?
- पोलिसांवर कोणाचा दवाव आहे का?
- गुन्हेगारी प्रवृत्त करणाऱ्या रिल्स कोण पसरवत?
- छोटे मोठे व्यावसायिकांची मुस्कट दाबी कोण करत?
- गुन्हेगारांना राजकीय अभय नको?
- गुन्हेगारांना रस्ता अडवून, कर्कश व नियमबाह्य साउंड लावून उन्माद माजवायला स्पॉन्सरशिप कोण करत अश्या प्रकारे गुन्हेगारांना संघटीत होण्यास कोण प्रवृत्त करत?
- गुन्हेगारी वृत्तीचे लोक वर्गणीच्या नावाखाली पोळक्याने खंडणी मागतात कारवाई कोण करणार?
- गुन्हे नोंद असणाऱ्या गुन्हेगारांचे अनधिकृत फ्लेक्स बॅनरवर चमकोगिरी वर का कारवाई होत नाही?
- कोथरूड मध्ये सतत होणाऱ्या चोऱ्या, खून, हाणामाऱ्या याला जबाबदार कोण?
जाहीर निषेध
याला जबाबदार कोण? (टिप – ह्या संदेश मागे कोणाचाही राजकीय द्वेष भावना नाही, ही खरी परिस्थिती आहे)
-समस्त गावकरी कोथरूड व त्रस्त नागरिक
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात गुंडांनी उच्छाद मांडला आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरामध्ये गाडीला धक्का लागल्यामुळे वाद झाला आणि त्यातून एका आयटी इंजिनियर देवेंद्र जोग या तरूणाला गजा मारणेच्या गुंडांनी बेदम मारहाण केली. हा जोग केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असून मंत्र्यांचे निकटवर्तीयच जर सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांचा काय? असा सवाल आता पुणेकर विचारत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील टोळीचा म्होरक्या, कुख्यात गुंड गजा मारणेनं गुन्हेगारीला सुरवात कशी केली?
-नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला शिंदेसेनेत जाणार! नेमकं कारण काय?
-“स्थायी समिती सदस्य होण्यासाठी माझ्याकडे राऊतांनी २५ लाखांची मागणी” शिंदेसेनेचा गंभीर आरोप
-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी कधी?
-धनुष्यबाण हाती घेण्याआधी धंगेकरांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची ऑफर!