पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी पुणे शहरातील विविध कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी रात्री अमित शहा कोरेगाव पार्क भागातील एका हॉटेलमध्ये आले होते. या पार्श्वभूमीवर शहरात २ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त बाणेर-बालेवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेत देखील बदल करण्यात आला आहे.
शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शहांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्याची बैठक होत आहे. जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तााची आखणी करण्यात आली आहे. शहा यांच्या दौऱ्यानिमित्त २ हजार पोलीस, तसेच २०० अधिकारी बंदोबस्तास तैनात राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: बुलेटराजांची पोलिसांनी बंद केली फटफट; थेट सायलेन्सरच केले…
-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जेवणात किडे-अळ्या, व्हिडीओ व्हायरल
-पीएमपीत ‘मराठी भाषा’ बंधनकारक करण्याचे आदेश; कार्यालयीन कामकाज ‘मराठी’तूनच
-शिंदेंची भेट धंगेकरांना महागात, काँग्रेसने महत्त्वाच्या कमिटीत घेणं टाळलं; नेमकं काय घडलं?