पुणे : पुणे शहरामध्ये सध्या गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. जीबीएस आजारामुळे पुणे शहरात आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात पहिल्यांदा सिंहगड रस्ता परिसरामध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या आढळून आली. या आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने पाणी तपासणी मोहिम हाती घेतली. यामध्ये दूषित पाणी पिल्याने हा आजार होत असल्याचे स्पष्ट झाले.
पुणे पालिकेने तपासणीनंतर शहरातील महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासह खासगी टँकर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्पांचे पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील ७० पाणी नमुन्यांमध्ये जीवाणंसूह विषाणू आढळले आहेत. जीबीएसचा उद्रेक झालेल्या सिंहगड रस्ता परिसरातील महापालिकेकडून पुरवठा सुरू असलेल्या पाण्याचे १ हजार ६१८ नमुने पाणीपुरवठा विभागाने पर्वती जलकेंद्रात तपासले.
‘१२ नमुने पिण्यास अयोग्य आढळले. त्यात कॉलिफॉर्म आणि ई-कोलाय हे जीवाणू आढळले. याचबरोबर या परिसरातील खासगी टँकरमधील पाण्याचे १८ नमुने पर्वती जलकेंद्रात तपासण्यात आले. त्यातील १५ नमुने पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला असून, अद्याप ३ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. तसेच, या परिसरातील ३६ आरओ प्रकल्पांचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यातील २३ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले’, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरातील अनेकक भागातील पाणी नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले. पालिकेकडून शहराला पुरवण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये जीवाणूंसह विषाणूंचा देखील आढळले आहे. त्यामुळे पुणे पालिकेकडून शहराला पाणी पुरवले जाते ते पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाणी स्रोत जीबीएस रुग्णसंख्या
नांदेड गाव विहीर -७९
महापालिका पाणी पुरवठा -४०
खडकवासला धरण -१०
वडगाव बुद्रक जलशुद्धीकरण केंद्र -२
अज्ञात स्रोत -३
ग्रामपंचायत -१
विहिरीचे पाणी -१
महत्वाच्या बातम्या-
-हाय सिक्युरटी नंबर प्लेटचं गौडबंगाल! सामान्यांना हजारोंचा भुर्दंड कशासाठी?
-उद्यापासून दहावीची परिक्षा; ७०१ परीक्षा केंद्रांवरील पूर्ण स्टाफ बदलला, नेमकं कारण काय?