पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु आहे. महाविकास आघाडीमधून स्वबळावर लढणार असल्याचा काहीसा सूर उमटत आहे. अशातच महाविकास आघाडी आणि महायुतीचे एकत्रित लढायचे की स्वबळावर याबाबत अद्याप ठरलेले नाहीत. अशातच आता पुण्यातील ससून रुग्णालयाजवळील मंगळवार पेठेतील सुमारे २ एकर मोक्याची जागा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नव्या वादाची ठिणगी पडल्याचे पहायला मिळाले आहे.
ससून रुग्णालयाजवळील ही जागा खासगी विकासकाला पोटभाडे करारावर देण्यात आल्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झाल्याचा आरोप असून, हा व्यवहार थांबवून तेथे पुण्यात प्रस्तावित असलेले स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारावे, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी लिहिले आहे.
मंगळवार पेठेतील भूखंड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधकाम व्यावसायिकाला ६० वर्षांच्या कराराने दिला आहे. पीडब्लूडीची जागा ही नितीन गडकरी यांना एमएसआरडीसीला ऑफिससाठी दिली होती. त्यांनी तिथे ऑफिसही केले नाही. एका बिल्डरला टेंडर वगैरे काहीही न करता ६० कोटी रुपयांना दिली. या जागेत कॅन्सर हॉस्पिटल केले पाहिजे ही आमची मागणी होती. तात्कालीन मंत्री हसन मुश्रिफ यांनी विधानसभेत सांगितले होते. अजित पवारांनी आमची भूमिका मान्य केली होती. अजित पवारांनी एसएसआरडीसीला पैसे कमी पडत असतील तर त्यांना ६० कोटी रुपये आम्ही देतो. त्यांना दुसरी जागा देतो. मात्र तरीही ४०० कोटी रुपये किंमत असलेला हा भूखंड ६० कोटी रुपयांना पोटभाडे करारावर देण्यात आली. ‘ही जागा बांधकाम व्यावसायिकासाठी न देता पुणेकरांसाठी कर्करोग रुग्णालयाला द्यावी’, अशी मागणी उज्ज्वल केसकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हाय सिक्युरटी नंबर प्लेटचं गौडबंगाल! सामान्यांना हजारोंचा भुर्दंड कशासाठी?
-उद्यापासून दहावीची परिक्षा; ७०१ परीक्षा केंद्रांवरील पूर्ण स्टाफ बदलला, नेमकं कारण काय?
-शिवजन्मोत्सव: सरदारांकडून शिवरायांना वंदन; शिवजयंतीच्या जल्लोषाने दुमदुमली पुण्यनगरी