पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स वाढला पण विधानसभा निवडणुकीत चांगलाच मार खावा लागला. त्यानंतर आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व राजकीय गोष्टी मागे टाकून पक्षाध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत.
शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील आमदार, खासदारांची तसेच पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली आहे. येत्या २८ फेब्रुवारीला वाय.बी. चव्हाण सेंटरला शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या अपयशानंतर शरद पवार पहिल्यांदाच मोठी बैठक घेत आहेत.
शरद पवार हे या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि तसेच पक्षांतील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीमध्ये शरद पवार हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार की स्वबळावर लढणार ही देखील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील स्थानिक नेते, पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल होण्याच्या शक्यता आहेत, राजकीय वर्तुळात अशा चर्चा देखील सुरु आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटना बळकट बनवण्यासाठी आणि पालिका निवडणुकीसाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने शरद पवारांनी पुन्हा एकदा मैदानात एन्ट्री केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आपल्याला पुणे जिंकायचंच’, बावनकुळेंचा नारा; पुण्यात भाजप ‘एकला चलो’?
-प्रसिद्ध कॅफेमधून ऑर्डर केला चॉकलेट शेक अन् डिलिव्हर झाला ‘उंदीर शेक’, पुढे काय झालं?
-रात्री-अपरात्री मांजराचे आवाज एक महिला अन् ३५० मांजरी; नेमका काय प्रकार?
-मॅट्रिमोनिअल साईटवरची ओळख पडली महागात, लग्न होण्याआधीच आयटीमधील तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार
-GBS: पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे ‘जीबीएस’ची लागण; काय म्हणाले अजित पवार?