पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उबाठा) ला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच कोकणातील बडे प्रस्थ असणाऱ्या राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पुणे शहरात देखील ठाकरेंचे अनेक सैनिक शिंदेसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप कोणताही मोठा प्रवेश होऊ शकलेला नाही. दुसरीकडे ठाकरेंच्या एका उपशहर प्रमुखांनी शिंदेंकडे जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
२२ वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत उपशहर प्रमुख राजेश पळसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पदाचा राजीनामा देत असताना पळसकर यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये ‘नव्यांना रामराम आणि निष्ठावंतांना थांब थांब’ सुरू असल्याची टीका केली आहे. पळसकर हे शिंदेंचे नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र शिवसेनेत पडलेला फुटी नंतर तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय फोडण्यात आले होते. त्याचवेळी कात्रज चौकामध्ये उदय सामंत यांची गाडी देखील फोडण्यात आली होती. गाडी फोडण्यामध्ये राजेश पळसकर हे देखील असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रवेशाला काही नेत्यांकडून विरोध झाल्याने त्यांनी आज थेट सामंत यांची भेट घेतली.
राजेश पळसकर यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर सामंतांकडून त्यांना प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘कॉमेडी शो’च्या नावाखाली अश्लिल भाषा; समय रैनाचा उठला बाजार, नेमकं घडलं काय?
-‘व्हॅलेंटाईन डे’ला चढली झिंग, पुण्यात महिलेचा दारु पिऊन तमाशा; भर रस्त्यात बसली अन्…
-“सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब”; पुण्यात नितेश राणेंच्या विरोधात बॅनरबाजी
-Metro News: शंकर महाराजांच्या समाधी स्थळाला धक्का नाही; महामेट्रोने मार्ग बदलला!
-‘अध्यक्ष कोणीही केला तरी काँग्रेस शून्यच’; आशिष शेलारांची टीका