पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रमाण वाढत असून शहरात नाईट लाईफ देखील वाढताना दिसत आहे. शहरात मध्यरात्री मद्यपी तरुणांकडून धिंगाणा झाल्याचे पहायला मिळते. अशातच आता वानवडी येथील जगताप चौकात एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याचा प्रकार पहायला मिळाला. पुणे स्टेशन परिसरातील सतत सुरू असणाऱ्या पबमधून ही महिला पार्टी करून आल्याची माहिती प्राथमिक मिळत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते ललित ससाणे यांनी या प्रकरणाची त्वरित दखल घेत वानवडी पोलीस ठाण्यात फोनद्वारे तक्रार नोंदवली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत होती. जागेवर गर्दी जमल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला. ललित ससाणे यांनी हा प्रकार उघडकीस आणत पोलीस प्रशासनाला वेळीच कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, महिलेने रस्त्यावर घातलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ललित ससाणे यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलिसांकडून यावर कितपत तत्पर कारवाई झाली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्याचे आणि पोलिसांनी अशा घटनांवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब”; पुण्यात नितेश राणेंच्या विरोधात बॅनरबाजी
-Metro News: शंकर महाराजांच्या समाधी स्थळाला धक्का नाही; महामेट्रोने मार्ग बदलला!
-‘अध्यक्ष कोणीही केला तरी काँग्रेस शून्यच’; आशिष शेलारांची टीका
-जास्तीच्या निधीसाठी भाजपच्या आमदारांची जोरदार फिल्डींग! पालिका आयुक्तांकडून कोणाला झुकतं माप?
-जानेवारी महिन्यात पुणेकरांचा सुखकर प्रवास, पीएमपी अपघातांना ब्रेक; नेमका कसा घडतोय बदल?